Virat vs Rohit: द. आफ्रिकेविरुद्धच्या ODI मालिकेतून विराट कोहली माघार घेण्याची शक्यता | पुढारी

Virat vs Rohit: द. आफ्रिकेविरुद्धच्या ODI मालिकेतून विराट कोहली माघार घेण्याची शक्यता

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मालिका सुरू होणार आहे. भारतीय निवड समितीने कसोटी संघाची घोषणा केली असून संघाच्या कर्णधार पदी विराट कोहली (Virat Kohli) कायम आहे. तर अजिंक्य रहाणेच्या जागी रोहित शर्माला उपकर्णधार करण्यात आले आहे. द. आफ्रिका दौ-यात वनडे मालिकाही खेळवली जाणार आहे. विराटची वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आली. त्याच्या जागी रोहित शर्मा (Rohit Sharma) संघाचे नेतृत्व करेल. नुकताच याबाबतचा निर्णय बीसीसीआयच्या निवड समीतीने जाहीर केला. (Virat vs Rohit)

विराट कोहलीने (Virat Kohli) स्वतः हून टी-20 संघाचे चे कर्णधारपद सोडले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, बीसीसीआयने विराट कोहलीला वनडेचे कर्णधारपद सोडण्यासाठी वेळ दिला होता, पण विराट कोहलीने तसे न केल्याने निवडकर्त्यांनी विराटला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटवावे लागले. निवड समितीच्या या धक्कादायक निर्णयानंतर अनेक पडसाद उमटले. सोशल मीडियावर चर्चा झडल्या. विराटवर हा अन्याय असल्याचे अनेकांनी व्यक्त केले, तर रोहितच कसा वनडे संघाचा बेस्ट कॅप्टन आहे असे अनेकांनी सांगितले. आता अशीही बातमी समोर येत आहे की, विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून आपले नाव मागे घेण्याची शक्यता आहे. (Virat vs Rohit)

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. या दौ-याची सुरुवात कसोटी मालिकेने होईल. पहिला कसोटी सामना २६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. तीन कसोटी सामन्यांनंतर एकदिवसीय मालिका सुरू होईल. कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली असून या मालिकेचे नेतृत्व विराट कोहली (Virat Kohli) करणार आहे. तर रोहित शर्मा (Rohit Sharma) उपकर्णधार असेल. एकदिवसीय मालिका नंतर खेळवली जाणार असल्याने त्याचा संघ जाहीर झालेला नाही. (Virat vs Rohit)

अशातच एक धक्कदायक माहिती समोर येत आहे. विराट कोहली एकदिवसीय मालिकेतून माघार घेणार असून त्याने याबाबत निवड कळवल्याची शक्यता अनेकांनी वर्तवली आहे. लवकरच भारतीय निवड समिती वनडे मालिकेसाठी संघाची घोषणा करणार आहे. त्याचवेळी सगळं स्पष्ट होईल. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील वनडे मालिकेत कोणाला उपकर्णधार कुणाला केलं जाईल याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. (Virat vs Rohit)

दरम्यान, जेव्हापासून विराटला वन-डेच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले आहे, तेव्हापासून त्याने स्वत:हून कोणतेही वक्तव्य केले नाही. यादरम्यान विराटने बरेच ट्विट केले आहेत, मात्र या प्रकरणावर काहीही न बोललेलेच बरे, अशी त्याने भूमिका घेतली आहे. विराटने सोशल मीडियातून सीडीएस बिपिन रावत यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहिली, अनेक जाहिराती देखील पोस्ट केल्या, परंतु कर्णधारपदाबद्दल त्यांने काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तो गप्प का आहे? त्याच्या मनात काय चाललं आहे? हे जाणून घेण्यासाठी त्याचे अतुरलेले आहेत. विराट कोहली जेव्हा दक्षिण आफ्रिका मालिकेत जाईल तेव्हा त्यालाही या वनडे संघाच्या कर्णधारपदावर प्रश्न विचारले जातील, त्यात तो काय उत्तर देतो हे पाहावे लागेल. मात्र, विराट कोहली वनडे मालिकेचा भाग असेल की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही. या दौऱ्यासाठी निवडकर्ते टीम इंडियाची घोषणा कधी करतील, त्यानंतरच ते निश्चित होईल. (Virat vs Rohit)

 

Back to top button