भारत-पाक सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचा धोका; न्यूयॉर्कमध्ये सुरक्षा वाढवणार

भारत-पाक सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचा धोका; न्यूयॉर्कमध्ये सुरक्षा वाढवणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : आगामी आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कट्टर, पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध लढणार आहे. ९ जून रोजी न्यूयॉर्कमध्ये ही लढत होणार आहे. या सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचा धोका आहे. आयआयएसशी संबंधित एका दहशतवादी संघटनेने 'लोन वुल्फ' हल्ल्याची धमकी देणारा व्हिडिओ जारी केला आहे. त्यामुळे सामन्यापूर्वी न्यूयॉर्कमध्ये सुरक्षा वाढवली जाणार आहे.

आगामी आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाने गुरुवारपासून सरावाला सुरुवात केली आहे. प्रत्यक्ष विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारतीय संघाचा एकमेव सराव सामना १ जून रोजी बांगला देशविरुद्ध होणार आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंडविरुद्ध होईल. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतीक्षित सामना ९ जून रोजी न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. त्यानंतर १२ जून रोजी सहयजमान अमेरिका व १५ जून रोजी कॅनडाविरुद्ध भारताचे उर्वरित साखळी सामने होणार आहेत. यंदा विश्वचषकाची फायनल २९ जून रोजी होईल.

'लोन वुल्फ हल्ल्याची धमकी'

भारत आणि पाकिस्तान बहुप्रतिक्षित सामन्याच्या अगोदर न्यूयॉर्क येथील नासाऊ काउंटी क्रिकेट स्टेडियममध्ये सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. दहशतवादी संघटनेने धमकी दिल्याने संभाव्य लोन वुल्फ हल्ला लक्षात घेऊन सुरक्षा कर्मचारी बंदोबस्त करत आहेत. सामन्यात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. सामन्यादरम्यान सर्वत्र सुरक्षा कर्मचारी तैनात असतील. न्यूयॉर्कच्या गव्हर्नर कॅथी हॉचुल यांनी सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचे निर्देश दिले आहेत. नासाऊ काउंटीचे पोलीस आयुक्त पॅट्रिक रायडर यांनी सांगितले की, व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये दहशतवादी गटाने 'लोन वुल्फ' हल्ल्याची धमकी दिली आहे. हे दहशतवादी संघटनांशी संबंधित सदस्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

९ जून तारीख व्हिडिओमध्ये नमूद

पोलिस आयुक्त रायडर यांनी सांगितले की, एप्रिलमध्येही अशा धमक्या आल्या होत्या, त्या धमक्या 'आयएसआयएस-के'ने दिल्या होत्या. ISIS-K ने आता दिलेल्या धमकीमध्ये ठिकाणाचे नाव उघड केलेले नाही, परंतु तारीख नमूद केली आहे. ९ जून ही तारीख आहे आणि या दिवशीच भारत-पाकिस्तान सामना आहे. व्हिडिओमध्ये 'लोन वुल्फ' दहशतवादी संघटना हल्ल्याची धमकी देत ​​आहे. हा व्हिडिओ ISIS-K ने ब्रिटिश चॅट साइटवर पोस्ट केला आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news