Vinesh Phogat : कुस्तीपटू विनेश, अंशू मलिक यांचे पॅरिस ऑलिंपिक तिकीट फायनल | पुढारी

Vinesh Phogat : कुस्तीपटू विनेश, अंशू मलिक यांचे पॅरिस ऑलिंपिक तिकीट फायनल

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने महिलांच्या 50 किलो वजनी गटात पॅरिस ऑलिम्पिक कोटा मिळवला आहे. किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे सुरू असलेल्या आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या लॉरा गनिक्याजीचा पराभव करून विनेशने ही कामगिरी केली. विनेशने 50 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत लॉराचा 10-0 असा पराभव केला. (Vinesh Phogat)

विनेशची दमदार सुरुवात

विनेशने महिलांच्या 50 किलो गटात कोरियन प्रतिस्पर्धी मिरान चेओनचा एक मिनिट 39 सेकंद चाललेल्या सामन्यात पराभव केला. तिच्या मजबूत पकडीला विरोधी खेळाडूकडे उत्तर नव्हते. पुढच्या सामन्यात विनेशने कंबोडियाच्या स्मनांग डिटचा अवघ्या 67 सेकंदात पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीच्या सामन्यात तिने कझाकिस्तानच्या लॉरा गनिक्याजीचा पराभव करून फ्रान्स ऑलिंपिकचे टिकिट आपल्या नावावर केले. (Vinesh Phogat)

अंशू मलिकने पॅरिस ऑलिंपिकमध्ये मिळवला कोटा

विनेश फोगाटसह अंशू मलिकनेही महिलांच्या 57 किलो वजनी गटात भारतासाठी कोटा मिळवला आहे. अंशूने आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या उपांत्य फेरीत उझबेकिस्तानच्या कुस्तीपटूचा 10-0 असा पराभव केला.

हेही वाचा :

Back to top button