खेड, पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील बोरज येथे अनिल भिखू गुहागरकर (वय ५३) यांच्या ताब्यातील बोअर बंदूक आणि जिवंत काडतुसे तसेच याच गावातील राजेश गजानन साळवी याच्याकडे असलेली विनापरवाना बंदुक रत्नागिरी गुन्हा अन्वेषण शाखेने जप्त केली.
अनिल गुहागरकर यांच्याकडे जप्त केलेली बोअर बंदूक ही २५ हजार रुपयांची असून ८ जिवंत काडतुसांची किंमत २ हजार ४०० रुपये आहे. तर राजेश साळवी यांच्याकडे सापडलेली एक सिंगल बोअर बंदूक २५ हजार रुपयांची असून १ हजार, २०० रुपयांची ४ जिवंत काडतुसे सापडली आहेत. भारतीय हत्यार अधिनियमप्रमाणे पीएसआय आकाश साळुंखे व त्यांचे सहकारी आंबेकर, साळवी, नार्वेकर यांनी ही कारवाई केली.
हेही वाचा