IPL 2024 | हेलिकॉप्टर शॉट झाला जुना; आता धोनीचा विकेटच्या मागे ३६० डिग्री शॉट्स (Video)

IPL 2024 | हेलिकॉप्टर शॉट झाला जुना; आता धोनीचा विकेटच्या मागे ३६० डिग्री शॉट्स (Video)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलच्या प्रत्येक सामन्यात चाहते माही मॅजिकची वाट पाहत असतात. महेंद्रसिंग धोनीने दिल्ली विरुद्धही शानदार फलंदाजी केली होती. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या गेल्या सामन्यात धोनीने हार्दिक पांड्याविरुद्ध एकापाठोपाठ तीन षटकार ठोकले होते. IPL मधील हे वादळ त्याने सुरूच ठेवले आहे. शुक्रवारी धोनीने अवघ्या नऊ चेंडूत दोन षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने २८ धावा केल्या. यादरम्यान त्याने मारलेला ३६० डिग्री शॉट पाहून सगळेच अवाक् झाले.

IPL 2024 चा ३४ वा सामना शुक्रवारी (दि.१९) चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात LSG च्या होम ग्राउंड एकना स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात सुपर जायंट्सने सुपर किंग्जचा ८ विकेट राखून पराभव केला. सीएसकेने हा सामना गमावला असला तरी महेंद्रसिंग धोनीचा विंटेज अवतार मैदानावर दिसला. हेलिकॉप्टर शॉट्सनंतर त्याने ३६० डिग्री शॉट्सचे दर्शन घडवले. मोईन अलीने २० चेंडूंत षटकारांसह ३० धावांची दमदार खेळी केली. शेवटची दोन षटके उरली असताना महेंद्रसिंग धोनीने पुन्हा वादळ आणले आणि पहिल्या ४ चेंडूंत १२ धावा चोपल्या. धोनी या सामन्यात ९ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह २८ धावांवर नाबाद राहिला. त्याने यश ठाकूरला १०१ मीटर मॉन्स्टर सिक्स मारला. त्यानंतर त्याने मोहसीन खानला विकेटच्या मागे ३६० डिग्री षटकार लगावला. माहीने मोहसीनला ज्या पद्धतीने षटकार मारला ते पाहून सर्वच आश्चर्यचकीत झाले. सोशल मीडियावर या षटकाराचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांनी कमेंट्समध्ये असेही म्हटले आहे की, "आतापर्यंत माहीचा हेलिकॉप्टर शॉट पाहिला होता, पण हा शॉट काही वेगळा होता."

दरम्यान, लखनौ सुपर जायंटस्ने चेन्नई सुपर किंग्जला ८ विकेटस्नी हरवून गुणतालिकेतील आपले स्थान आणखी भक्कम केले. चेन्नई सुपर किंग्जने पहिल्यांदा खेळताना १७६ धावा केल्या. प्रत्युत्तरात के. एल. राहुल (८२) आणि क्विंटन डीकॉक (५४) यांनी रचलेल्या १३४ धावांच्या पायावर लखनौने विजयी महाल बांधला.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news