LSG vs GT : नाणेफेक जिंकत लखनौचा फलंदाजीचा निर्णय | पुढारी

LSG vs GT : नाणेफेक जिंकत लखनौचा फलंदाजीचा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : लखनौ सुपरजायंट्सचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी लखनौ संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. या सामन्यासाठी गुजरातने संघात काही बदल केले आहेत. संघाचा यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा दुखापतीमुळे या सामन्यात खेळणार नाही. स्पेन्सर जॉन्सन संघात परतला आहे. ओमरझाईच्या जागी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे, तर बीआर शरत गुजरातकडून पदार्पण करणार आहे.  हा सामना  लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर खेळला जात आहे.

हेही वाचा : 

Back to top button