Crime Diary : ‘बबली’ची करामत! विवाहाला पाहुणी म्हणून आली आणि….

Crime Diary
Crime Diary

त्या घटनेची शहरात चांगलीच चर्चा होत होती. मोठ्या घरचे लग्न. साराच डामडौल मोठा..! मात्र, याच धामधुमीत जीवाचा जिवलग मानलेल्या नवरदेवाच्या घरीच मोठी चोरी झाली. इश्कात बुडालेल्या 'बंटी'ला देखील हा मोठाच झटका ठरला. विवाहाला पाहुणी म्हणून आली आणि झटका देऊन गेली..'बबली'च्या या कारनाम्याची ही सत्यकथा… ( Crime Diary )

पश्चिम महाराष्ट्रातील एका शहरात काही वर्षांपूर्वी घडलेली ही घटना! एका उच्चमध्यवर्गीय कुटुंबात मुलाच्या विवाह सोहळ्याची धामधूम सुरू होती. मुलगा अमेरिकेत नोकरीस असल्याने सोहळ्याचा थाट औरच होता. लग्नाला नातेवाईकांची मोठीच गर्दी झाली होती. मात्र, याच लग्नात आतापर्यंत कधी फारशी न आलेली, तशी नात्यातीलच मात्र लांबून खास लग्नासाठी आलेल्या तनयाने आपल्या रूपाने, आणि मिठ्ठास बोलण्याने सर्वांच्याच मनात घर केले. लग्न धामधुमीत झाले. सारे सायंकाळी कार्यालयातून घरी आले. तनयादेखील वर्‍हाडघरी आली. दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर परत गावाकडे जायचे, त्याआधी ती संध्याकाळी मित्राला भेटायला जाते म्हणून निघून गेली. मात्र, रात्री उशिरा जेवताना बोलकी तनया कोठे दिसेना, ती कोठे गेली असा विषय निघाला; पण कोणतरी घरातलेच म्हणाले की, ती सकाळी लवकर गावाकडे जाणार आहे. म्हणून एका जुन्या मित्राला भेटायला गेली आहे. यावर तिच्याबाबत फारसा विचार झाला नाही.

रात्र संपली..दिवस उजाडला…नवविवाहित दाम्पत्याचे देवदर्शनाला जाण्याचे ठरले. नवविवाहित दाम्पत्याची आतील रूममध्ये आवराआवरीची धांदल सुरू झाली आणि रूममधून एकच दंगा सुरू झाला. मुलाचे सोन्याचे दागिने सापडत नसल्याने घरातील सारेच हादरले. घरची मंडळी हादरली, तर मुक्कामास राहिलेले सारेच नातेवाईक गप्प झाले. लग्नघराचे वातावरण काही क्षणातच बदलून गेले. सार्‍यांचीच मती गुंग झाली. हळूहळू चर्चा, अंदाज सुरू झाले. घरात कोण अनोळखी आले होते का, कोण संशय येण्यासारखे वागले का, याची चर्चा सुरू झाली. एवढ्यात एका नातेवाईकाने पोलिसांत तक्रार देण्याची सूचना केली. तडक वरपित्यासह काही जबाबदार व्यक्तींनी थेट पोलिस ठाणे गाठले. सोन्याची साखळी, काही दागिने आणि लाखभर रुपयांची रोकड लंपास झाल्याची तक्रार पोलिसांनी नोंद करून घेतली.

ठाणे अंमलदार चव्हाण हे पोलिस खात्यात

 लग्न घरातील चोरी करणारी व्यक्ती बर्‍याचवेळा नातेवाईक असते, हे त्यांच्या या आधी घडलेल्या अशा अनेक घटनांतून लक्षात आले होते. सारी तक्रार नोंदवून घेतल्यानंतर त्यांनी वरपित्याला विचारले, तुमचा कोणावर काही संशय आहे का? या प्रश्नात वरपित्याची मान कधी नकारार्थी हलली, हे त्यांना देखील कळले नाही. वरपित्याने नाही म्हणताच एका चाणाक्ष नातेवाईकाने त्यांना अडवित, तनया काल लगेच निघून गेल्याचे सांगितले. प्रथम तिच्यावर कोणी संशय घेईना. पण चव्हाण म्हणाले, कोण तनया, काय भानगड आहे? त्यावर वरपिताच म्हणाले, नाही हो साहेब, ती फार सरळमार्गी मुलगी आहे. ती चोरी करणे शक्यच नाही. मात्र, चव्हाण यांनी मात्र हेका सोडला नाही. स्टेशन डायरीत रीतसर नोंद करून ते सार्‍याबरोबर लग्न घरात आले. त्यांनी सर्व खोल्यांची तपासणी केली.

तनया मुक्कामाला होती त्या खोलीत त्यांनी बारकाईने पाहणी केली. ड्रेसिंग टेबलवर त्यांना एक लिफाफा सापडला. त्यावर मागील बाजूस एका तरुणाचा जवळील एका शहरातील एकाचा पत्ता आणि त्यांच्या फर्मचे नाव होते. या तरुणाची मात्र माहिती नसल्याचे वरपित्याने सांगितले. यावर मात्र चव्हाण यांचा संशय अधिकच बळाविला. त्या कार्डवरील क्रमांकावर दूरध्वनी न करता समक्ष तेथे जाण्यासाठी त्यांनी तातडीने गाडीचे नियोजन केले. मनाशी काही एक अटकळ बांधून एक महिला पोलिस त्यांनी बरोबर घेतली.

तनयाच्या खोलील सापडलेल्या त्या कार्डवरील पत्ता पॉश कॉलनीत एका बंगल्याचा होता. चव्हाण यांनी सहकारी पोलिसांसमवेत त्या बंगल्याच्या मुख्य दरवाजाची घंटा वाजविली. दरवाजा उघडला तो एका तरुणाने, चव्हाण यांनी आत येता येताच आपली ओळख करून खडसावले..तनया कोठे आहे? त्या तरुणाने आतील खोलीत बोट दाखविले आणि काय प्रकार आहे हे विचारले; पण त्याला थांबवित महिला पोलिसाला चव्हाण यांनी आधी आतील रूममध्ये पाठविले. आतील खोलीत तनया अलगद पोलिसांच्या हातात आली. खरे तर ती तेथून आपल्या गावाकडे निघण्याच्याच तयारीत होती. सुरुवातीला ती काही बोलेनाच. मात्र, महिला पोलिसाने थोडा 'प्रसाद' देताच ती पोपटासारखी बोलू लागली. पोलिसांनी तिच्या बॅगेची तपासणी केली. त्यात लग्नघरातील वराचे दागिने, रोख रक्कम सापडलीच,

शिवाय आणखीन एक सोन्याचे ब्रेसलेट सापडले. त्याबाबत खडसावताच तिने ते आपल्या प्रियकराचे असल्याचे सांगितले. एव्हाना तो तरुण प्रियकर आपल्याच प्रेयसीने आपलेच सोन्याचे ब्रेसलेट चोरले म्हटल्यावर तनयाला मारण्यासाठी धावू लागला. तनया यांची मात्र तपास एका चोरीचा आणि उघड झाल्या दोन चोर्‍या असा स्थिती झाली. पोलिसांनी या चोरीतील दागिने, रोख रकमेसह तनयाला अटक केली. रीतसर तिला न्यायदेवतेने योग्य ती शिक्षा ठोठावली. ( Crime Diary )

संबंधित बातम्या 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news