PBKS vs GT : गुजरातविरूद्ध पंजाबच ‘किंग’

PBKS vs GT : गुजरातविरूद्ध पंजाबच ‘किंग’
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल 2024 मध्ये रोज एक नवा तारा उदयास येत आहे. कालपर्यंत फारसा कोणाला माहीत नसणारा शशांक सिंह याने पंजाब किंग्जला अशक्यप्राय विजय मिळवून दिला. पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या सामन्यात पंजाबने गुजरातवर 3 विकेटस्नी विजय मिळवला. शशांक सिंहने 29 चेंडूंत 61 धावा करून पंजाब मेलला विजयाच्या ट्रॅकवर आणले.

गुजरात टायटन्सने पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात 20 षटकांत 4 बाद 199 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिलने दमदार फलंदाजी करत 48 चेंडूंत नाबाद 89 धावांची खेळी केली. यामुळे गुजरात पंजाबसमोर 200 धावांचे लक्ष्य ठेवू शकला. सुरुवातीच्या पडझडीनंतर शशांकने जिद्दीने किल्ला लढवला आणि 6 चौकार आणि 4 षटकार मारून विजय खेचून आणला.

गुजरात टायटन्सचे 200 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाबची सुरुवात खराब झाली होती. मात्र आधी प्रभसिमरन (35 धावा) त्यानंतर शशांक सिंहने डाव सावरत पंजाबला 12 षटकांत 111 धावांपर्यंत पोहोचवले. शशांक सिंह एका बाजूने लढत असताना दुसर्‍या बाजूने पंजाब किंग्जच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी त्याची साथ सोडली. पंजाबची अवस्था 17 षटकांत 6 बाद 159 धावा अशी झाली होती. पंजाबला विजयासाठी 18 चेंडूंत 41 धावांची गरज होती.

आशुतोष शर्माने अझमतुल्ला टाकत असलेल्या 18 व्या षटकात तीन चौकारांसह 16 धावा वसूल केल्या. यामुळे सामन्यात रंगत निर्माण झाली. पंजाबने सामना 12 चेंडूंत 25 धावा असा आणला. त्यानंतर 19 व्या षकात शशांक सिंह आणि आशुतोष शर्माने मोहित शर्माच्या षटकात 18 धावा चोपून काढत सामन्यावर पकड निर्माण केली. शेवटच्या षटकांत 7 धावांची गरज असताना पहिल्याच चेंडूवर दर्शन नळकांडेने आशुतोष शर्माला बाद केले.   त्याने 17 चेंडूंत 31 धावा केल्या. दुसरा चेंडू नळकांडेने बाऊन्सर टाकला. मात्र तो हरप्रीत ब्रारच्या डोक्यावरून गेल्याने एक वाईडची धाव मिळाली. मात्र गुजरातने रिव्ह्यू घेतला अन् तिसर्‍या अंपायरने चेंडू वैध ठरला. चार चेंडूंत 6 धावांची गरज असताना नळकांडेने तिसर्‍या चेंडूवर एक धाव निघाली. तीन चेंडूंत 5 धावा हव्या असताना शशांकने चौथ्या चेंडूवर चौकार मारत गुजरातच्या सामना 2 चेंडूंत 1 धाव असा आणला. 2 चेंडूंत 1 धावांची गरज असताना शशांक सिंहने एक धाव घेत सामना जिंकून दिला.

तत्पूर्वी, पंजाबचा कागिसो रबाडा हा पुन्हा एकदा गुजरात टायटन्ससाठी धोकादायक ठरला. त्याने वृद्धिमान साहा (11) ला माघारी पाठवले. गिल व केन यांनी डाव सावरला; परंतु त्यांच्या धावांचा वेग हवा तसा नव्हता.

हरप्रीत ब्रारने 40 धावांची ही भागीदारी केनला (26) बाद करून तोडली. मात्र, साई सुदर्शनने गुजरातच्या धावांचा वेग वाढवला आणि त्याने सिकंदर रझाचा चांगलाच समाचार घेतला. साई 19 चेंडूंत 6 चौकारांसह 33 धावांवर झेलबाद झाला. आयपीएलमध्ये सर्वात वेगाने 3000 धावा करणार्‍या भारतीय फलंदाजांमध्ये शुभमनने आज दुसरे स्थान पटकावले. लोकेश राहुलने 80 इनिंग्जमध्ये हा पल्ला पार केला होता, तर गिलला 92 इनिंग्ज खेळाव्या लागल्या.

गुजरातकडून 1500 हून अधिक धावा करणारा गिल पहिला फलंदाज ठरला. यानंतर हार्दिक पंड्या (833), डेव्हिड मिलर (817) यांचा क्रम येतो. गिलचे मांडीचे स्नायू ताणलेले गेले आणि त्याला प्राथमिक उपचार घ्यावा लागला. गुजरातसाठी 50 षटकार ठोकणारा तो पहिला फलंदाज ठरला. त्याने कागिसो रबाडाला खणखणीत षटकार खेचून हा पराक्रम केला. विजय शंकर (8) पुन्हा अपयशी ठरला आणि रबाडाने सामन्यातील दुसरी विकेट घेतली. शुभमनने 87 वी धाव काढताच यंदाच्या पर्वातील सर्वोत्तम वैयक्तिक खेळीची नोंद त्याच्या नावावर झाली. गुजरातने 4 बाद 199 धावा उभ्या केल्या. राहुलने 8 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकारासह नाबाद 23 धावा केल्या, तर शुभमन 48 चेंडूंत 6 चौकार व 4 षटकारांसह 89 धावा केल्या.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news