IPL 2024 : मुंबईचा पराभव करत गुजरात टायटन्सची विजयी सलामी | पुढारी

IPL 2024 : मुंबईचा पराभव करत गुजरात टायटन्सची विजयी सलामी

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2024 हंगामातील पाचवा सामना आज (दि.२४) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. या रोमहर्षक सामन्यात गुजरातने मुंबई इंडियन्सचा सहा धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने  २० षटकांत ६ गडी गमावून १६८ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सला केवळ १६२ धावा करता आल्या. रोहित शर्मा आणि डेवाल्ड ब्रेविस यांनी दमदार खेळी केली. मात्र अखेरच्या षटकात उमेश यादवने हार्दिक पांड्या आणि पियुष चावलाची विकेट घेत सामनाच पलटला.  २० षटकात १६२ धावांवर नऊ विकेट घेत गुजरातने मुंबईचा डाव गुंडाळला. (IPL 2024 )

मुंबई इंडियन्सला दुसरा धक्का; नमन धीर २० धावांवर बाद

मुंबईला दुसरा धक्का ३० धावांवर बसला. इशान किशननंतर फलंदाजीला आलेला नमन धीर २० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अजमतुल्ला उमरझाईने त्याला एलबीडब्ल्यू आऊट केले.

 मुंबईची खराब सुरूवात; ईशान किशन शुन्यावर आऊट

पहिल्याच षटकात मुंबईची खराब सुरूवात झाली. फलंदाजीला सुरुवात करण्यासाठी आलेला ईशान किशन खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला अजमतुल्ला उमरझाईने यष्टिरक्षक रिद्धिमान साहाच्या हाती झेलबाद केले. (IPL 2024)

गुजरातचे मुंबईसमोर १६९ धावांचे आव्हान

गुजरातने मुंबई इंडियन्सविरुद्ध २० षटकांत ६ गडी गमावून १६८ धावा केल्या. मुंबईला विजयासाठी १६९ धावांचे आव्हान होते. या सामन्यात जसप्रीत बुमराह सर्वोत्तम ठरला. त्याने चार षटकात १४ धावा दिल्या आणि तीन बळी घेतले.

 गुजरातला तिसरा धक्का; उमरझाई १७ धावांवर बाद

अजमतुल्ला उमरझाईच्या रूपाने गुजरातला तिसरा धक्का बसला. १२ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर गेराल्ड कोएत्झीने टिळक वर्माच्या हाती झेल दिला. साई सुदर्शनसोबत तिसऱ्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी केली. त्याला एक चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १७ धावा करता आल्या.

गुजरातला दुसरा धक्‍का

आठव्‍या षटकात पियुष चावल्‍याने शुभमन गिलला रोहित शर्मा करवी झेलबाद केले. शुभमनने २२ चेंडूत ३ चौकार व १ षटकार पटकावत ३१ धावा केल्‍या. गुजरातचे सलामीवीर शुभमन गिल आणि रिद्धिमान साहा यांनी संघाला चांगील सुरुवात करुन दिली. मात्र चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने साहा क्लीन बोल्ड केले. त्‍याने १९ धावा केल्‍या. पाच षटकांनंतर गुजरातने १ गडी गमावत ४७ धावा केल्‍या.

Back to top button