IPL 2024 : ‘या’ तीन अष्टपैलू खेळाडूंच्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद

IPL 2024 : ‘या’ तीन अष्टपैलू खेळाडूंच्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलच्या प्रत्येक मोसमात खेळाडूं बॅट किंवा बॉलने वेगवेगळ्या विक्रमांची नोंद करत असतात. टी-20 एक असा फॉरमॅट आहे, ज्यामध्ये अष्टपैलू खेळाडूंची भूमिका खूप महत्त्वाची असते. अष्टपैलू खेळाडू डेथ ओव्हर्समध्ये संघासाठी धावा देखील करतो आणि महत्त्वाच्या टप्प्यावर विकेट घेतो. आयपीएलमध्येही अष्टपैलू खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. या लीगमध्ये असे तीन खेळाडू आहेत. ज्यांनी फलंदाजीमध्ये 1000 हून अधिक धावा करण्यासोबतच गोलंदाजीमध्ये 150 हून अधिक विकेट्सही आपल्या नावावर केल्या आहेत. जाणून घेवूयात त्या खेळाडूंबद्दल… (IPL 2024)

'या' अष्टपैलू खेळाडूंच्या नावावर खास विक्रमाची नोंद

भारतातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असलेल्या रवींद्र जडेजाने आयपीएलमधील कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या जडेजाने आयपीएलमध्ये 2692 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याच्या नावावर 152 विकेट आहेत. चेन्नईचा माजी खेळाडू ड्वेन ब्राव्हो विकेट घेण्याच्या बाबतीत जडेजाच्या पुढे आहे, त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 183 विकेट्स घेतल्या आहेत. यासह त्याने फलंदाजीमध्ये 1560 धावा केल्या आहेत. या यादीत तिसरे नाव आहे ते कोलकाता नाईट रायडर्स (KKR) चा करिष्माई कॅरेबियन फिरकीपटू सुनील नरेनचे. आयपीएलमध्ये 1046 धावा करण्यासोबतच नरेनच्या नावावर 163 विकेट्स आहेत. या यादीत जडेजा एकमेव भारतीय आहे, तर ब्राव्हो आणि नरेन हे वेस्ट इंडिजचे आहेत. (IPL 2024)

जडेजा आणि नरेन यांच्यात पुढे जाण्याची स्पर्धा

चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू ब्राव्होने क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे. सध्या तो चेन्नईचा गोलंदाजी कोच म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे या यादीतील जडेजा आणि नरेन या दोन खेळाडूंमध्ये विकेट्सच्या बाबतीत पुढे जाण्यासाठी स्पर्धा होणार आहे. यावेळीही जडेजा आणि नरेन त्यांच्या जुन्या फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्व करणार आहेत. नरेन आणि जडेजा यांच्यात सध्या नऊ विकेट्सचा फरक आहे. मात्र, धावा करण्याच्या बाबतीत जडेजा नरेन आणि ब्राव्होच्या पुढे आहे.

गोलंदाज        धावा    विकेट
ड्वेन ब्राव्हो    1560   183
सुनील नरेन    1046   163
रवींद्र जडेजा   2692   152

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news