IND vs ENG 5th Test : दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला; भारत मजबूत स्थितीत | पुढारी

IND vs ENG 5th Test : दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला; भारत मजबूत स्थितीत

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि इंग्लंड यांच्यात धर्मशाला येथे पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना खेळला जात आहे. भारतीय संघ मालिकेत आधीच 3-1 ने आघाडीवर आहे. अशा परिस्थितीत हा सामना जिंकून टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील आपले स्थान मजबूत करण्यासाठी मैदानात उतरली आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने पहिल्या डावात 218 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव सुरू आहे. आज सामन्याचा दुसरा दिवस आहे. (IND vs ENG 5th Test)

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला; भारत मजबूत स्थितीत

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना धर्मशाला येथे खेळला जात आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने पहिल्या डावात आठ गडी गमावून ४७३ धावा केल्या आहेत. सध्या कुलदीप यादव २७ धावांवर आणि जसप्रीत बुमराह १९ धावांवर नाबाद आहे.

बुमराह-कुलदीपने डाव सावरला

बुमराह आणि कुलदीप यांनी नवव्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी केली. दोन्ही फलंदाजांनी संयमी फलंदाजी केली.भारताची धावसंख्या सध्या आठ विकेट्सवर 462 धावा आहे. कुलदीप 27 आणि बुमराह 19 धावा करून क्रीजवर आहे. सध्या टीम इंडियाकडे आघाडी 255 धावांची आघाडी आहे.

भारताला आठवा धक्का; अश्विन बाद

डावाच्या 102 ओव्हरमध्ये अश्विनच्या रूपात भारताला आठवा झटका बसला. त्याला इंग्लंडचा गोलंदाज हार्टलीने बाद केले. अश्विनने आपल्या खेळीत खातेही उघडता आले नाही.

भारताला पाठोपाठ धक्के; जुरेल-जडेजा माघारी

427 धावसंख्येवर भारताला दोन धक्के बसले. ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजा सलग दोन षटकांत बाद झाले. जुरेलला शोएब बशीरने डकेटच्या हाती झेलबाद केले. तर टॉम हार्टलीने जडेजाला एलबीडब्ल्यू आऊट केले. एकेकाळी भारताची धावसंख्या 4 बाद 403 होती आणि आता टीम इंडियाने 24 धावांमध्ये तीन विकेट गमावल्या आहेत. सध्या कुलदीप यादव आणि रविचंद्रन अश्विन क्रीजवर आहेत. टीम इंडियाची आघाडी सध्या 209 धावांची आहे.

भारताला पाचवा धक्का; देवदत्त पडिकल बाद

भारताला 403 धावांवर पाचवा धक्का बसला. देवदत्त पडिक्कल 103 चेंडूत 65 धावा करून बाद झाला. त्याला शोएब बशीरने क्लीन बोल्ड केले. पडिक्कलने आपल्या खेळीत 10 चौकार आणि एक षटकार लगावला. सध्या रवींद्र जडेजा आणि ध्रुव जुरेल क्रीजवर आहेत. पदिक्कलने पदार्पणाच्या कसोटीतील पदार्पणाच्या डावात शानदार फलंदाजी केली. त्याने सर्फराज खानसोबत ९७ धावांची भागीदारी केली. सर्फराज ५६ धावा करून बाद झाला. भारताची आघाडी सध्या 187 धावांची आहे.

भारताला चौथा धक्का; सर्फराज खान बाद

सामन्याच्या 85 व्या ओव्हरमध्ये सर्फराज खानच्या रूपात भारताला चौथा धक्का बसला. त्याला इंग्लंडचा फिरकीपटू शोएब बशिरने जो रूटकरवी झेलबाद केले. सर्फराज खानने आपल्या खेळीत 60 बॉलमध्ये 56 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 8 चौकार आणि 1 षटकार लगावला. सर्फराज आणि पडिकलने चौथ्या विकेटसाठी 132 बॉलमध्ये 92 धावांची भागिदारी केली.

टी- ब्रेकपर्यंत भारत 3 बाद 376

दुसऱ्या दिवसाच्या चहापानापर्यंत भारताने पहिल्या डावात तीन विकेट गमावून मोबदल्यात 376 धावा केल्या आहेत. सध्या देवदत्त पडिक्कल 44 आणि सर्फराज खान 56 धावांसह खेळत आहेत. चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये आतापर्यंत 97 धावांची भागीदारी झाली आहे.

सर्फराजने कसोटी कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक झळकावले आहे. त्याचबरोबर पडिक्कलने कसोटीतील पदार्पणाच्या डावात आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे. सध्या भारताकडे 158 धावांची आघाडी आहे. इंग्लंडने पहिल्या डावात 218 धावा केल्या होत्या. आज भारताला दोन धक्के बसले. रोहित शर्मा 103 धावा करून बाद झाला तर शुभमन गिल 110 धावा करून बाद झाला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 171 धावांची भागीदारी केली होती.

पडिक्कल-सरफराजने डाव सावरला

भारताने तीन फलंदाज गमावून 370 धावा केल्या आहेत. भारताचे सेट फलंदाज शुभमन आणि रोहित बाद झाल्यानंतर देवदत्त आणि सर्फराज यांनी संयमी फलंदाजी करत संघाचा डाव सावरला . सर्फराज 51 धावा तर देवदत्त पडिक्कलने 43 धावा केल्या आहेत. दोघांमध्ये आतापर्यंत 91 धावांची भागीदारी झाली आहे. तर भारताकडे सध्या 152 धावांची आघाडी आहे.

सरफराजचे अर्धशतक

सर्फराज खानने आपल्या कसोटी कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक झळकावले. आतापर्यंत त्याने देवदत्त पडिक्कलसोबत चौथ्या विकेटसाठी 80 हून अधिक धावांची भागीदारी केली आहे. भारतीय संघाची आघाडी 145+ धावांची आहे. पडिक्कलही अर्धशतकाच्या जवळ आहे.

अॅन्डरसनचा भारताला धक्का; शुभमन क्लीन बोल्ड

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर डावातील 63 व्या ओव्हरमध्ये शुभमन गिलच्या रूपात भारताला तिसरा धक्का बसला. त्याला इंग्लडचा वेगवान गोलंदाज अॅन्डरसनने क्लीन बोल्ड केले. गिलने आपल्या खेळीत 150 बॉलमध्ये 110 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 12 चौकार आणि 5 षटकार लगावले.

स्टोक्सचे जबरदस्त पुनरागमन; रोहित शर्मा क्लीन बोल्ड

बेन स्टोक्सने प्रदीर्घ कालावधीनंतर गोलंदाजीत जबरदस्त पुनरागमन केले आहे. या मालिकेतील पहिल्याच चेंडूवर त्याने रोहित शर्माला क्लीन बोल्ड केले. रोहितने 162 चेंडूत 103 धावांची खेळी केली. आपल्या खेळीत त्याने 13 चौकार आणि 3 षटकार मारले. रोहित आणि शुभमनने दुसऱ्या विकेटसाठी 171 धावांची भागीदारी केली. सध्या शुभमन गिल 110 धावा तर देवदत्त पडिक्कलने 4 धावांवर खेळत आहे.

लंचपर्यंत भारत 1 बाद 264

इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दुसऱ्या दिवशी लंचपर्यंत भारताने एका विकेट गमावून 264 धावा केल्या आहेत. सध्या रोहित शर्मा 102 आणि शुभमन गिल 101 धावांवर फलंदाजी करत आहे. आतापर्यंत दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 160 धावांची भागीदारी झाली आहे. इंग्लंडने पहिल्या डावात 218 धावा केल्या होत्या. या स्थितीत आघाडी 46 धावांची आहे. भारताला एकमेव झटका गुरुवारी यशस्वीच्या रूपाने बसला. तो 57 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

आजच्या पहिल्या सत्रातील 30 ओव्हरच्या खेळात भारताने एकही विकेट न गमावता 4.30 च्या रन रेटने 129 धावा केल्या. यावेळी रोहितने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 12वे शतक तर शुभमन गिलने चौथे शतक झळकावले. या मालिकेतील रोहितचे हे दुसरे शतक ठरले. याआधी राजकोट येथील तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने 131 धावा केल्या होत्या. तर शुभमनचे या मालिकेतील पहिले शतक आहे. शुभमनने चौकार मारून आपले शतक पूर्ण केले.

रोहित-शुभमन यांचे धमाकेदार शतक

इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने कसोटी कारकिर्दीतील 12वे शतक झळकावले आहे. याच्या पुढच्याच बॉलवर शुभमन गिलनेही आपले शतक झळकावले. त्याचे हे कसोटी कारकिर्दीतील चौथे शतक आहे. त्याच्या शतकाच्या वेळी त्याचे वडीलांनी उभे राहून त्याचे अभिनंदन केले. रोहितने 154 बॉलमध्ये तर शुभमनने 136 बॉलमध्ये शतक झळकावले

या मालिकेत शुभमनचे तीन वेळा शतक हुकले. मात्र, आज त्याने आपले शतक पूर्ण केले. त्याचबरोबर या मालिकेत रोहितने आणखी एक शतक झळकावले आहे. राजकोट कसोटीच्या पहिल्या डावात त्याने 131 धावा केल्या होत्या. भारताने एका विकेटवर 262 धावा केल्या आहेत. सध्या शुभमन 100 धावा करून क्रीजवर आहे आणि रोहित 101 धावा केल्यानंतर. दोघांमध्ये 158 धावांची भागीदारी झाली आहे.

भारताची इंग्लंडवर आघाडी

मालिकेतील अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताने इंग्लंडचा डाव 218 धावांवर भारतीय संघाने गुंडाळला होता. या आव्हानाचा पाठलाग भारतीय संघाने एका फलंदाजाच्या मोबदल्यात केला. यामध्ये रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी उत्तम फलंदाजी केली.

रोहित-शुभमन जोडीची शतकी भागीदारी

रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली आहे. रोहित-शुभमन यांनी कसोटीत शतकी भागीदारी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. आता भारताची धावसंख्या एका विकेट गमावून 206 धावा आहे. सध्या शुभमन ६५ आणि रोहित ८० धावांवर नाबाद आहेत.

भारताची धावसंख्या 200 पार

इंग्लंडने दिलेल्या आव्हानचा पाठलाग करताना भारताने एका फलंदाज गमावून 202 धावा केल्या आहेत. सध्या शुभमन गिल 65 आणि रोहित शर्मा 76 धावांसह खेळत आहेत. दोघांमध्ये 98 धावांची भागीदारी झाली आहे.

शुभमन गिलचे अर्धशतक

शुभमन गिलने आपल्या कसोटी कारकिर्दीतील सातवे अर्धशतक ६४ चेंडूत झळकावले.  त्याचे हे इंग्लंडविरुद्धचे चौथे अर्धशतक आहे. सध्या भारताची धावसंख्या एका विकेटवर 186 धावा आहे. शुभमन गिल 51 धावा करून क्रीजवर आहे तर रोहित शर्माने 74 धावा केल्या आहेत. दोघांमध्ये 82 धावांची भागीदारी झाली आहे. भारत अजूनही 32 धावांनी मागे आहे.

रोहित – शुभमनची अर्धशतकी भागिदारी

सामन्यात जैस्वाल बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या शुभमनने कर्णधार रोहितसोबत दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी केली आहे. सध्या रोहित 72 तर शुभमन 38 धावांवर खेळत आहे.

हेही वाचा : 

Back to top button