INDvsENG 5th Test : धर्मशाला कसोटीसाठी इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा! संघात एक बदल | पुढारी

INDvsENG 5th Test : धर्मशाला कसोटीसाठी इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा! संघात एक बदल

पुढारी ऑनलाईन डेस्क : (INDvsENG 5th Test) : इंग्लंडने भारताविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीसाठी प्लेइंग-11 जाहीर केला आहे. इंग्लिश संघ व्यवस्थापनाने संघात फक्त एक बदल केला आहे. वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सनच्या जागी मार्क वुडचे पुनरागमन झाले आहे. चौथ्या कसोटीत त्याला विश्रांती देण्यात आली आणि त्याच्या जागी रॉबिन्सन खेळला. भारताने ही मालिका आधीच जिंकली आहे. टीम इंडियाने मालिकेत 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. शेवटची कसोटी जिंकून टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या गुणतालिकेत आपले स्थान आणखी मजबूत करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय संघ सध्या डब्ल्यूटीसीमध्ये अव्वल स्थानावर आहे. (INDvsENG 5th Test)

इंग्लंड 4 गोलंदाजांसह मैदानात

इंग्लंडच्या प्लेइंग-11 मध्ये दोन फिरकीपटू आणि दोन वेगवान गोलंदाज आहेत. रांची कसोटीच्या पहिल्या डावात पाच बळी घेणारा शोएब बशीर आपली जागा वाचवण्यात यशस्वी ठरला. तो टॉम हार्टले फिरकीत साथ देईल. वुडशिवाय अँडरसन वेगवान गोलंदाजी करताना दिसणार आहे. या कसोटीत बेन स्टोक्स गोलंदाजी करतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्याने गोलंदाजीचा सराव केल्याचे समोर आले आहे. धर्मशाला येथील खेळपट्टी साधारणपणे वेगवान गोलंदाजांना अनुकूल असते. अशा स्थितीत स्टोक्सही हात उघडू शकतो. त्याच वेळी, रूट अतिरिक्त गोलंदाजाची भूमिका बजावेल. रेहान अहमद लंडनला परतला असून तो मालिकेतून बाहेर पडला आहे. (INDvsENG 5th Test)

पाचव्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची प्लेइंग-11

जॅक क्रोली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), शोएब बशीर, टॉम हार्टली, मार्क वुड, जेम्स अँडरसन.

अँडरसन सलग चौथी कसोटी खेळणार (INDvsENG 5th Test)

41 वर्षीय जेम्स अँडरसन सलग चौथी कसोटी खेळताना दिसणार आहे. आतापर्यंत इंग्लंडने तीन वेगवान गोलंदाजांना आजमावले असून अँडरसन त्यापैकी सर्वाधिक यशस्वी ठरला आहे. त्याच्या नावावर आठ विकेट्स आहेत, तर वुडला फक्त चार विकेट घेता आल्या आहेत. हार्टले हा या मालिकेतील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याच्या नावावर 20 विकेट्स आहेत. तर, बशीरने 12 विकेट घेतल्या आहेत. हार्टलीनंतर बुमराह, जडेजा आणि अश्विनचा क्रमांक लागतो. तिघांनीही 17-17 विकेट मिळवल्या आहेत.

Back to top button