David Warner : दिल्‍ली संघाला धक्‍का, ‘हा’ दिग्गज खेळाडू ‘आयपीएल’ला मुकणार?

David Warner : दिल्‍ली संघाला धक्‍का, ‘हा’ दिग्गज खेळाडू ‘आयपीएल’ला मुकणार?

पुढारी ऑनलाईन डेस्क : दुखापतीमुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधून बाहेर पडणार्‍या खेळाडूंची संख्‍या वाढतच आहे. आता यामध्‍ये ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू डेव्हिड वॉर्नरची भर पडली आहे. आयपीएलमध्ये  दिल्ली संघाकडून खेळणाऱ्या वॉर्नरला न्यूझीलंडविरूद्धच्या टी-20 सामन्यात दुखापत झाली आहे. यापूर्वी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे 'आयपीएल'मधून बाहेर पडला आहे. (David Warner)

IPL 2024 हंगाम सुरू होण्यास महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. असे असताना दिल्ली कॅपिटल्ससमोर अडचण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यापूर्वी डेव्हिड वॉर्नरला दुखापत झाली आहे. कंबरेच्या दुखापतीमुळे तिसऱ्या टी-२० सामना त्याला सामना खेळता येणार नाही. (David Warner)

टी- 20 विश्वचषकापूर्वी वॉर्नरची ही शेवटची द्विपक्षीय टी-२० मालिका आहे.  ऑस्ट्रेलियाला कोणतीही द्विपक्षीय टी-20 मालिका खेळणार नाही. यानंतर ऑस्ट्रेलिया संघ जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत थेट सहभागी होणार आहे. ऑस्ट्रेलियन संघ सध्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे.

…तर, वॉर्नर लवकर बरा होवू शकतो

फिजिओचे म्हणण्यानुसार, वॉर्नरला तंदुरुस्त होण्यासाठी थोडा वेळ लागेल. यामुळे आयपीएल 2024 आणि वेस्ट इंडीज आणि यूएसए येथे होणाऱ्या ICC T20 विश्वचषक 2024 मध्ये त्याच्या सहभागाला कोणताही धोका नाही.

वॉर्नर अनुपस्थितीत स्मिथवर ओपनिंगची कमान

डेव्हिड वॉर्नरच्या अनुपस्थितीत स्टीव्ह स्मिथकडे सलामीची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्यासोबत ट्रॅव्हिस हेड सलामी देणार आहे. या मालिकेत मिचेल मार्शच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघ खेळत आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेतही त्याच्या नेतृत्वाखाली संघ खेळताना दिसणार असल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news