IND vs ENG, 4th Test : रांचीतील खेळपट्टी पाहून इंग्‍लंडचा कर्णधार स्‍टोक्‍स ‘शॉक’, म्‍हणाला… | पुढारी

IND vs ENG, 4th Test : रांचीतील खेळपट्टी पाहून इंग्‍लंडचा कर्णधार स्‍टोक्‍स 'शॉक', म्‍हणाला...

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारत आणि इंग्‍लंडमधील पाच सामन्‍यांच्‍या कसोटी मालिकेतील चौथा सामना शुक्रवार, २२ फेब्रुवारीपासून रांचीत खेळवला जाणार आहे. रांची येथे इंग्‍लंडचा संघ दाखल झाला आहे. मात्र येथील खेळपट्टी पाहून इंग्‍लंडचा कर्णधार बेन स्‍टोक्‍स याला धक्‍का बसला आहे. मी अशा प्रकारची खेळपट्टी कधी पाहिली नव्‍हती, असे त्‍याने म्‍हटले आहे. ( IND vs ENG, 4th Test )

IND vs ENG 4th Test : अशा प्रकारच्‍या खेळपट्टीवर …

बीबीसी स्पोर्टशी बोलताना स्‍टोक्‍स म्‍हणाला की, “ मी अशा प्रकारची खेळपट्टी यापूर्वी कधीच पाहिली नाही. मला कल्पना नाही की, अशा प्रकारच्‍या खेळपट्टी काय होऊ शकतं हे मला माहीत नाही. खेळपट्टीकडे मी ज्‍या दृष्‍टीकोनातून पाहतो. त्‍यामुळे मला ती वेगळी दिसली, कारण चेंजिंग रूम्समधून तुम्‍हाला खेळपट्टी गवताळ दिसते; परंतु तुम्ही जवळ जावून पाहिलं तर गडद आणि त्यावर काही तडे गेलेले दिसले.”

‘क्रिकबझ’शी बोलताना इंग्लंडचा उपकर्णधार ऑली पोप म्‍हणाला की, ही खडबडीत खेळपट्टीचा फायदा भारताचा ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन याला मिळू शकतो. या खेळपट्टीचा अर्धा भाग चांगला आहे आणि नंतर दुसऱ्या भागात बरीच तडे गेले आहेत. उद्या काय होते ते पाहू, मग तिथून निर्णय घेऊ,”

IND vs ENG 4th Test : कसोटी मालिकेत इंग्‍लंड पिछाडीवर

भारताने पाच सामन्‍यांच्‍या कसोटी मालिकेतील राजकोट कसोटीत इंग्लंडला ४३४ धावांनी पराभव पत्करावा लागला. त्‍यामुळे इंग्‍लंड कसोटी मालिकेत १-२ असा पिछाडीवर आहे. आता रांची येथील खेळपट्टीची धास्‍ती इंग्‍लंडच्‍या कर्णधार बेन स्‍टोक्‍स याने घेतली असून, येथील सामनाही रंगतदार होण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे.

हेही वाचा :

 

 

Back to top button