IND vs ENG : इंग्लंडविरूद्धच्या उर्वरित ३ कसोटी सामन्यांतून विराटची माघार; तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर | पुढारी

IND vs ENG : इंग्लंडविरूद्धच्या उर्वरित ३ कसोटी सामन्यांतून विराटची माघार; तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये १५ फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. त्याआधी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. अनुभवी फलंदाज विराट कोहलीने मालिकेतील उर्वरित तीन कसोटी सामन्यांमधून आपले नाव मागे घेतले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराटने बीसीसीआयला आपल्या निर्णयाची माहिती दिली आहे. (IND vs ENG)

कोहलीने शुक्रवारी बीसीसीआयला त्याच्या उपलब्धतेची माहिती दिली. त्याच दिवशी, निवडकर्त्यांनी राजकोट, रांची आणि धर्मशाला येथे होणाऱ्या कसोटीसाठी संघ निश्चित करण्यासाठी ऑनलाइन बैठक घेतली. (IND vs ENG)

मालिकेच्या सुरुवातीला कोहलीने भारतीय कर्णधार रोहित शर्मा, संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांशी बोलले आणि देशाचे प्रतिनिधित्व करणे हे नेहमीच आपले सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे यावर भर दिला. तथापि, काही वैयक्तिक परिस्थिती त्याच्या उपस्थितीची आणि संपूर्ण लक्ष देण्याची मागणी करतात. नंतर बोर्डानेही विराटच्या निर्णयाचा आदर करत असल्याचे सांगितले.

इंग्लंडविरूद्धच्या मालिकेच्या सुरूवातीला विराटने भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांना आपला निर्णय सांगितला होता. यामध्ये विराटने वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये अनुपस्थितीत राहणार असल्याचे सांगितले होते. यानंतर मालिकेतील तिसऱ्या सामन्यासाठी संघाची निवड करण्यासाठी बीसीसीआयने विराटशी चर्चा केली. यावेळी त्याने उर्वरित सामन्यांतून माघार घेतल्याचे सांगितले.

विराट पाठोपाठ श्रेयस अय्यरची मालिकेतून माघार

भारतीय संघाच्या मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरही पुढील तीन कसोटी सामने खेळू शकणार नाही. अय्यर दुखापतीमुळे मालिकेतून संघातून बाहेर गेला आहे. बंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) त्याच्या पुढील प्रगतीवर लक्ष ठेवेल. फॉरवर्ड डिफेन्स खेळताना अय्यरने पाठीत आणि कंबरेत वेदना होत असल्याची तक्रार केली होती.

राहुल आणि जडेजा यांचे पुनरागमन

फलंदाज केएल राहुल आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा मालिकेतील दुसऱ्या कसोटीत खेळू शकले नाहीत. दोघांनाही तंदुरुस्त घोषित करण्यात आले असून त्यांनी संघात पुनरागमन केले आहे. हैदराबाद कसोटीच्या चौथ्या दिवशी जडेजाच्या हाताला दुखापत झाली. दरम्यान, राहुलला दुखापत होत असल्याची तक्रार केली होती.

आकाश दीपला संधी

वरिष्ठ निवड समितीने उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी गोलंदाज आकाश दीपची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आवेश खानला वगळण्यात आले आहे.

हेही वाचा :

Back to top button