Preity Zinta : जेव्हा मणिरत्नम म्हणाले, 'जा, चेहरा धुवून ये', प्रीतीने २६ वर्षांनंतर... | पुढारी

Preity Zinta : जेव्हा मणिरत्नम म्हणाले, 'जा, चेहरा धुवून ये', प्रीतीने २६ वर्षांनंतर...

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रीती जिंटाने तब्बल २६ वर्षांनंतर एका गोष्टीचा खुलासा केला आहे. कोई मिल गया, दिल है तुम्हारा, कभी अलविदा ना कहना, वीर जारा यासारख्या सुपरहिट चित्रपटांसाठी तिला ओळखले जाते. ती आतादेखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते.(Preity Zinta) दरम्यान, तिने शाहरुख खान सोबत दिल से चित्रपटाशी संबंधित एक किस्सा शेअर केला आहे, जो चर्चेत आला आहे. (Preity Zinta)

संबंधित बातम्या – 

२६ वर्षांनंतर प्रीती जिंटाने शेअर केला किस्सा

एक्सवर प्रीति जिंटाने लिहिलं, हा फोटो चित्रपट दिल सेच्या सेटवरील पहिल्या दिवशीचा होता. मी मणिरत्नम सर और शाहरुख खान यांच्यासोबत एकत्र काम करण्यासाठी खूप उत्सुक होते. जेव्हा मणि सरांनी मला पाहिलं आणि ते हसले व नम्रतेने म्हणाले, जाऊन चेहरा धुऊन ये… यावर प्रीती म्हणाली, पण सर… माझा मेकअप जाईल… ते म्हणाले- मला हेच वाटतं की… कृपया चेहरा धूवून या…

प्रीतीने पुढे लिहिलंय-ते पुन्हा हसले. मला वाटलं की ते चेष्टा करत आहेत…तेव्हा मला पुन्हा लक्षात आलं की, ती चेष्टा नव्हती. त्यांनी खरंच मला मेकअप काढण्यास सांगितले होते. अद्भुत संतोष सिवन (फोटोग्राफीचे दिग्दर्शक) यांना धन्यवाद, मी धुतलेल्या फ्रेश चेहऱ्यासह चित्रपट केला. मला वाटतं की, त्याने माझा ‘दिल से’ शूट केला.’

दिग्दर्शक मणि रत्नम यांचा दिल से १९९८ रोजी रिलीज केला होता. यामध्ये प्रीति जिंटा आणि शाहरुख खान शिवाय मनीषा कोइराला, मलायका अरोडा, जोहरा सहगल आणि संजय मिश्रा मुख्य भूमिकेत दिसले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Preity G Zinta (@realpz)

 

View this post on Instagram

 

A post shared by Preity G Zinta (@realpz)

Back to top button