IND vs ENG 2nd Test | पहिल्या दिवशी भारत मजबूत स्थितीत; जैस्वालची शानदार खेळी | पुढारी

IND vs ENG 2nd Test | पहिल्या दिवशी भारत मजबूत स्थितीत; जैस्वालची शानदार खेळी

पुढारी ऑनलाईन : इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने पहिल्या डावात सहा गडी गमावून ३३६ धावा केल्या. यामध्ये भारतीय संघाची सलामी जोडी मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरली. भारतीय संघाचा कर्णधार अवघ्या 14 धावा करून परतला. परंतु, यशस्वी जैस्वालने संयमी खेळी करत पहिल्या डावात 179 धावांवर नाबाद आहे. तर, रविचंद्रन अश्विन पाच धावांवर नाबाद आहे. (IND vs ENG 2nd Test)

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरुवात चांगली झाली होती. रोहितने यशस्वीसह पहिल्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी केली. परंतु रोहित 14 धावा करून बाद झाला. यानंतर यशस्वीने शुभमन गिलसह दुसऱ्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली.

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या शुभमन पुन्हा निराशाजनक कामगिरी केली. तो 34 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत पाच चौकार मारले. श्रेयस अय्यर २७ धावा करून झेलबाद झाला. आऊट होण्यापूर्वी श्रेयसने यशस्वीसोबत ९० धावांची भागीदारी केली. कसोटी पदार्पण करणारा रजत पाटीदारने 32 धावांची खेळी केली आणि तो दुर्दैवाने बाद झाला. त्याने यशस्वीसोबत 70 धावांची भागीदारी केली. त्यानंतर यशस्वीने अक्षरसोबत 52 धावांची भागीदारी केली. यामध्ये अक्षरने 27 धावा केल्या. (IND vs ENG 2nd Test)

तर श्रीकर भरत १७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. सध्या यशस्वीने 179 धावांच्या खेळीत 17 चौकार आणि पाच षटकार मारले आहेत. भारतीय संघ शनिवारी 400 हून अधिक धावा करण्याची संधी आहे. इंग्लंडकडून आतापर्यंत शोएब बशीर आणि रेहान अहमद यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले आहेत. त्याचबरोबर जेम्स अँडरसन आणि टॉम हार्टले यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली आहे. (IND vs ENG 2nd Test)

भारताला सहावा धक्का

330 च्या स्कोअरवर भारताला सहावा धक्का. रेहान अहमदने केएस भरतला शोएब बशीरकरवी झेलबाद केले. त्याला 17 धावा करता आल्या. सध्या यशस्वी जैस्वाल १७९ आणि रविचंद्रन अश्विन एका धावेसह खेळत आहेत.

भारताला पाचवा धक्का

भारताला 301 धावांवर पाचवा धक्का बसला. शोएब बशीरने अक्षर पटेलला रेहान अहमदकडे झेलबाद केले. त्याला 27 धावा करता आल्या. अक्षर आणि यशस्वी यांच्यात पाचव्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी झाली. सध्या श्रीकर भरत यशस्वीला पाठीशी घालायला आले आहेत. यशस्वी 167 धावा करून क्रीजवर आहे.

यशस्वीचे शानदार 150 धावा

यशस्वी जैस्वालने 150 धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने आपल्या खेळीत २३२ चेंडूत १७ चौकार आणि ४ षटकार लगावले. रुममध्ये उपस्थित खेळाडू आणि कर्मचाऱ्यांनी त्याला उभे राहून दाद दिली. यशस्वी 151 धावा करून आणि अक्षर पटेल 13 धावा करून क्रीजवर आहे.

रजत पाटीदार आऊट

पदार्पणाच्या सामन्यात रजत पाटीदार 32 धावांची खेळीकरून बाद झाला. या खेळीत त्याने तीन चौकार मारले. रजतने यशस्वीसोबत चौथ्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. सध्या भारताची धावसंख्या चार गड्यांच्या मोबदल्यात 250 धावांच्या पुढे गेली आहे. यशस्वी 150 धावांच्या जवळ आहे. त्याच्यासोबत अक्षर पटेल फलंदाजीसाठी आला आहे.

टी – ब्रेकपर्यंत भारत ३ बाद २२५

पहिल्या दिवशीच्या चहापानापर्यंत भारताने पहिल्या डावात तीन विकेट गमावून २२५ धावा केल्या आहेत. यशस्वी जैस्वाल 125 आणि रजत पाटीदार 25 धावांसह खेळत आहेत. चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये आतापर्यंत 46 धावांची भागीदारी झाली आहे. रोहित शर्मा 14 धावा करून, शुभमन गिल 34 धावा करून आणि श्रेयस अय्यर 27 धावा करून बाद झाला.

भारताला तिसरा धक्का; श्रेयस अय्यर बाद

१७९ धावांवर भारताला तिसरा धक्का बसला. या कसोटीच्या पहिल्या डावातही श्रेयस अय्यर अपयशी ठरला होता. त्याला टॉम हार्टलीने यष्टिरक्षक फॉक्सच्या हाती झेलबाद केले. त्याने 59 चेंडूत 27 धावा केल्या. श्रेयसने यशस्वीसोबत 90 धावांची भागीदारी केली.

यशस्वीचे शानदार शतक

यशस्वी जैस्वालने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक 151 चेंडूत झळकावले. यशस्वीने पदार्पणातच वेस्ट इंडिजविरुद्ध १७१ धावांची खेळी केली होती.

यशस्वी-श्रेयस यांची अर्धशतकी भागीदारी

यशस्वी आणि श्रेयस यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आहे. भारताने दोन गड्यांच्या मोबदल्यात 155 धावा केल्या आहेत. सध्या यशस्वी 86 आणि श्रेयस 21 धावांवर खेळत आहेत. (IND vs ENG 2nd Test)

लंच ब्रेकपर्यंत भारत २ बाद १०३

पहिल्या दिवशी उपाहारापर्यंत भारताने पहिल्या डावात दोन गडी गमावून 103 धावा केल्या आहेत. सध्या यशस्वी जैस्वाल ५१ धावा करून आणि श्रेयस अय्यर ४ धावा करून खेळत आहेत. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. रोहित 14 धावा करून बाद झाला. त्याला नवोदित शोएब बशीरने ओली पोपच्या हाती झेलबाद केले. त्यानंतर यशस्वीने शुभमन गिलच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली. गिल मोठी खेळी खेळू शकेल असे वाटत असतानाच जेम्स अँडरसनने त्याला यष्टिरक्षक फॉक्सकरवी झेलबाद केले. शुभमन पाच चौकारांच्या मदतीने 34 धावा करून बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केल्यापासून तो सातत्याने अपयशी ठरत आहे.

यशस्वीचे अर्धशतक

यशस्वी जैस्वालने 89 चेंडूत आपल्या कसोटी कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक झळकावले. यामध्ये त्याने सहा चौकार आणि एक षटकार मारला आहे. यशस्वी आणि श्रेयस अय्यर यांच्यावर मोठी भागीदारी करून टीम इंडियाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्याची जबाबदारी आहे. भारताला दोन धक्के बसले आहेत. रोहित १४ धावा करून तर शुभमन गिल ३४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. रोहितला बशीरने आणि शुभमनला अँडरसनने बाद केले. (IND vs ENG 2nd Test)

भारताला दुसरा धक्का; शुभमन गिल माघारी

भारताला ८९ धावांवर दुसरा धक्का बसला. जेम्स अँडरसनने शुभमन गिलला यष्टिरक्षक बेन फॉक्सकरवी झेलबाद केले. त्याने 46 चेंडूत 34 धावा केल्या. गिलने डावाची सुरुवात चांगली केली आणि पाच चौकार मारले, पण अँडरसनसमोर त्याला अडचणींचा सामना करावा लागला.

भारताला पहिला झटका, कर्णधार रोहित माघारी

सामन्यातील १८ व्या ओव्हरमध्ये कर्णधार रोहित शर्माच्या रूपात भारताला पहिला झटका बसला. त्याला इंग्लंडचा फिरकीपटू शोएब बसिरने पोपकरवी झेलबाद केले. आपल्या खेळीमध्ये रोहितने ४१ चेंडूत १४ धावांची खेळी केली.

भारतीय संघात बदल

दरम्यान, दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून मोहम्मद सिराजला बाहेर ठेवण्यात आले आहे. मालिकांचा कालावधी आणि अलीकडच्या काळात त्याने किती क्रिकेट खेळले आहे हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. राजकोट येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी तो संघात असणार आहे. तर आवेश खानला दुसऱ्या कसोटीसाठी संघात पुन्हा सामील करुन घेण्यात आले आहे. (IND vs ENG 2nd Test)

टीम इंडियाच्‍या फलंदाजांच्‍या हाराकिरीमुळे हैदराबाद कसोटी इंग्लंडने २८ धावांनी जिंकली होती.

Back to top button