रोहित शर्मा T-20 मध्‍ये @ 150! अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला क्रिकेटपटू

राेहित शर्मा ( संग्रहित छायाचित्र )
राेहित शर्मा ( संग्रहित छायाचित्र )
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma T20I) याने T-20 क्रिकेटमधील आणखी एक विश्‍वविक्रम आपल्‍या नावावर केला आहे. आज ( दि.१४ ) अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यासाठी मैदानात उतरताच त्‍याने  T20I मधील 150 सामन्‍यात खेळण्‍याचा विक्रम केला. 150 आंतरराष्‍ट्रीय T-20 सामने खेळणारा ताे जगातील पहिला पुरुष क्रिकेटपटू ठरला आहे. ( Rohit Sharma adds another T20I world record to his name with 150th appearance for India )

सर्वाधिक आंतरराष्‍ट्रीय T-20 सामने खेळणारा क्रिकेटपटू

आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमधील T20 फॉर्मेटमध्‍ये रोहित शर्मा हा मागील १४ महिने खेळला नाही. त्याने मोहालीतील अफगाणिस्तानविरुद्धच्या T-20 मालिकेत पहिल्‍या सामन्‍यात संघात पुनरागमन केले तसेच संघाचे नेतृत्वदेखील केले. T20I मध्ये 100 विजय मिळवणार्‍या संघातील खेळाडूही रोहित शर्मा बनला आहे. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्यांच्या यादीत रोहितनंतर आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंग याचा नंबर लागतो. स्टर्लिंग याने आतापर्यंत 134 सामने खेळले आहेत. त्याचा सहकारी जॉर्ज डॉकरेल १२८ सामन्यांसह या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. ( Rohit Sharma adds another T20I world record to his name with 150th appearance for India )

भारताकडून सर्वाधिक T20 सामने खेळणार्‍या क्रिकेटपटूंमध्‍ये रोहितच्या खालोखाल विराट कोहलीचा क्रमांक लागताे. त्‍याने आतापर्यंत ११६ आंतरराष्‍ट्रीय T20 सामने खेळले आहेत. विराट कोहलीनेही तब्‍बल १४ महिन्‍यांच्‍या विश्रांतीनंतर T20I संघात पुनरागमन केले आहे.

Rohit Sharma T20I कारकीर्द

T20 क्रिकेटमध्‍ये रोहित शर्मा हा जगाताील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक आहे. दक्षिण आफ्रिकेत 2007 मध्‍ये झालेल्‍या टी-20 विश्‍वचषक स्‍पर्धेत त्‍याने पदार्पण केले. रोहितने T20I मध्ये सर्वाधिक १८२ षटकार मारले आहेत. भारतीय सलामीवीर फॉर्मेटमध्ये सर्वाधिक 3853 धावा करणाऱ्यांच्या यादीत ताे दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत विराट कोहली पहिल्‍या क्रमांकावर आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news