IND vs AFG : विराटचे पुनरागमन; बाहेर कोण?

IND vs AFG : विराटचे पुनरागमन; बाहेर कोण?

इंदूर, वृत्तसंस्था : भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात टी-20 क्रिकेट सामन्यांची मालिका सुरू आहे. मोहालीतील पहिला सामना जिंकून भारताने मालिकेत आघाडी घेतली आहे. भारताने ही मालिका जिंकली तरी त्यांची ही कामगिरी मोठी म्हणता येणार नाही, पण वर्ल्डकपपूर्वी मोजकेच सामने खेळायचे असल्याने युवा खेळाडूंना निवड समितीचे लक्ष वेधण्याची ही मालिका शेवटची संधी आहे. त्यामुळे जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांना चांगली कामगिरी करावी लागेल. दुसर्‍या सामन्यात विराट कोहली खेळणार असल्याने संघातून बाहेर कोण जाणार याची उत्सुकता आहे.

जितेश शर्माने इशान किशनला मागे टाकत यष्टिरक्षक फलंदाज म्हणून संघात स्थान बळकट केले आहे. त्याला संधी छोटी मिळाली, पण त्याने कामगिरी मोठी केली. एन तिलक वर्माच्या बाबतीतही असेच म्हणावे लागेल. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत 3 सामन्यांत 139 धावा केल्या, पण त्यानंतर त्याची बॅट फारशी चमकलेली नाही, पण आता विराट कोहली संघात परतल्याने त्याच्यावर टांगती तलवार असेल. सलामीवीर यशस्वी जैस्वाल दुसर्‍या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. तसे झाले तर शुभमन गिलला बाहेर बसावे लागू शकते.

पिच रिपोर्ट (IND vs AFG)

इंदूरच्या छोट्या मैदानातील खेळपट्टी ही फलंदाजीस पोषक मानली जाते. येथे 2022 मध्ये झालेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात चारशेहून अधिक धावा झाल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेच्या रिली रोसो याने 48 चेेंडूंत शतक ठोकले आहे. आजच्या सामन्यातही अशीच फटकेबाजीची अपेक्षा आहे.

दुसरा टी-20 सामना

स्थळ : होळकर स्टेडियम, इंदूर
वेळ : संध्याकाळी 7.00 वा.
थेट प्रक्षेपण : स्पोर्टस् 18
लाईव्ह स्ट्रिमिंग : जिओ सिनेमा

हेही वाचा…

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news