इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत कोणाला मिळणार विकेटकीपर म्हणून संधी? | पुढारी

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत कोणाला मिळणार विकेटकीपर म्हणून संधी?

पुढारी ऑनलाईन डेस्क : दुखापतीतून परतल्यानंतर केएल राहुलने आपल्या फलंदाजी आणि विकेटकीपिंगच्‍या (यष्टीरक्षक) कौशल्याने सर्वांना आश्चर्यचकित केले. मागील वर्षी झालेल्या आयपीएल 2024 मध्ये राहुलला दुखापत झाली होती. यानंतर त्याने आशिया कपमध्ये पुनरागमन केले होते. तेव्हापासून त्याने अनेक महत्त्वाच्या सामन्यात महत्वाची भूमिका बजावली. यासह त्याने अनेक वेळा भारतीय संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढत सामना जिंकून दिला. (Ishan Kishan)

पुनरागमनानंतर मधल्या फळीत फलंदाजीसह यष्टिरक्षणाची जबाबदारी राहूलकडे सोपवण्यात आली होती. या दोन्ही भुमिकांमध्ये त्याने शानदार कामगिरी केली. मात्र, आता त्याला विश्रांती मिळावी यासाठी निवड समिती त्याच्याकडून यष्टिरक्षणाची अतिरिक्त जबाबदारी कमी करण्याचा विचार करत आहेत. तसेच संघ व्यवस्थापन इशान किशनच्या पुनरागमनाचाही विचार करत आहे. (Ishan Kishan)

सतत क्रिकेट खेळणाऱ्या राहुलचा अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेत समावेश करण्यात आलेला नाही. अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेनंतर भारताला इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. यासाठी राहुलची निवड होणार हे निश्चित असले तरी त्याला केवळ फलंदाज म्हणून संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, निवडकर्ते या इंग्लंडविरूद्धच्या मालिकेदरम्यान राहुलला यष्टिरक्षणाच्या जबाबदारीतून विश्रांती देण्याचा विचार करत आहेत. या मालिकेसाठी यष्टीरक्षकाचा संघात समावेश करण्याबाबत विचार करत आहेत. ऋषभ पंत दुखापतीमुळे उपलब्ध नाही तर, केएस भरत सुमार कामगिरीमुळे संघातून बाहेर आहे. यामुळे यष्टिरक्षक म्हणून इशान किशनचे संघात पुनरागमन होईल, अशी शक्‍यता व्‍यक्‍त हाेत आहे.

हेही वाचा :

Back to top button