AUS vs PAK 2nd Test : पाकिस्‍तान-ऑस्‍ट्रेलिया दुसर्‍या कसोटीत असं काय घडलं? जे चाहत्‍यांना हसवून गेलं!

ऑस्‍ट्रेलिया-पाकिस्‍तान कसोटीच्‍या तिसर्‍या दिवशी  थर्ड अंपायर रिचर्ड इलिंगवर्थ लिफ्टमध्ये अडकले. या घटनेची माहिती मैदानावरील पंचांना नव्हती.
ऑस्‍ट्रेलिया-पाकिस्‍तान कसोटीच्‍या तिसर्‍या दिवशी  थर्ड अंपायर रिचर्ड इलिंगवर्थ लिफ्टमध्ये अडकले. या घटनेची माहिती मैदानावरील पंचांना नव्हती.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : क्रिकेट हा अनेक शक्‍यतांचा खेळ. या खेळातील थरार चाहत्‍यांना नेहमीच भावतो. मात्र  मैदानावर आणि मैदानाबाहेर कळत-नकळत अनेक अशा गोष्‍टी घडतात की, चाहत्‍यांचे विशेष मनोरंजन होते. त्‍याच्‍या गालावरच हासू अधिक खुलते. असा एक प्रकार ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात मेलबर्न येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या घडला. ( AUS vs PAK 2nd Test) कसाेटी सामन्‍याच्‍या तिसऱ्या दिवशी उपाहारानंतर खेळ सुरू होण्यास उशीर झाला. यामागे एक विचित्र घटना समोर आली आहे. या घटनेमुळें चाहत्यांना हसू आवरता आले नाही.

AUS vs PAK 2nd Test : पंच अडकले लिफ्‍टमध्‍ये!

ऑस्‍ट्रेलिया-पाकिस्‍तान कसोटीच्‍या तिसर्‍या दिवशी दुपारच्या जेवणानंतर दोन्ही संघांचे खेळाडू आणि मैदानावरील पंच मैदानात आले. सर्वजण खेळ केव्‍हा सुरू होणार याची वाट पाहू लागले. मात्र, मैदानात आल्यानंतरही खेळ सुरू होऊ शकला नाही. वास्तविक, थर्ड अंपायर रिचर्ड इलिंगवर्थ लिफ्टमध्ये अडकले होते आणि ते त्यांच्या सेटअपमध्ये म्हणजेच थर्ड अंपायरच्या केबिनमध्ये परत जाऊ शकले नाहीत. याची माहिती खेळाडू आणि मैदानावरील पंचांना नव्हती. मात्र, काही वेळाने मैदानावरील पंचांना ही बाब समजली आणि त्यांनी खेळाडूंना परिस्थितीची माहिती दिली. हे वेळेत दुरुस्त करण्यात आले आणि इलिंगवर्थ त्याच्या केबिनमध्ये परत आल्याने खेळ पुन्हा सुरू झाला. मात्र, सोशल मीडियावर याविषयी  पंच ट्रोल होत आहेत.

AUS vs PAK 2nd Test : दुसर्‍या कसोटीवरही ऑस्‍ट्रेलियाची पकड

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा ३६० धावांनी पराभव झाला. दुसरा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून मेलबर्नमध्‍ये सुरू झाला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 318 धावा केल्या होत्या. मार्नस लॅबुशेनने 63, उस्मान ख्वाजाने 42 आणि मिचेल मार्शने 41 धावा केल्या. याशिवाय डेव्हिड वॉर्नरने 38 धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडून आमिर जमालने तीन बळी घेतले. तर शाहीन आफ्रिदी, मीर हमजा आणि हसन अली यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

प्रत्युत्तरात एकेकाळी दमदार सुरुवात करणारा पाकिस्तानचा संघ पहिल्या डावात 264 धावांत गारद झाला. एकेकाळी पाकिस्तानची धावसंख्या एका विकेटवर १२४ धावा होती आणि त्यानंतर संघाने १४० धावा करताना पुढचे नऊ विकेट गमावले. तिसऱ्या दिवशी पाकिस्तानचा डाव 264 धावांवर आटोपला. गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसरा डावात चार गडी गमावत २०१ धावांची आघाडी घेतली आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news