Australia vs Pakistan : डेव्‍हिड वॉर्नरने पाकिस्‍तान विरुद्ध रचला इतिहास, नव्‍या विक्रमाची नोंद

ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर डेव्हिड वॉर्नर. 
(संग्रहित छायाचित्र)
ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर डेव्हिड वॉर्नर. (संग्रहित छायाचित्र)

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान (Australia vs Pakistan) यांच्यातील बॉक्सिंग डेट कसोटी (Test Cricket) सुरु आहे. सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे काही काळ थांबवण्यात आला. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी 42.4 षटकांत दोन गडी गमावून 114 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner ) याने पाकिस्तानविरुद्धच्‍या दुसर्‍या कसोटी ३८ धावा करत नवा विक्रम आपल्‍या नावावर केला आहे.

Australia vs Pakistan : वॉर्नरची कारकिर्दीतील शेवटची कसोटी

डेव्हिड वॉर्नर सध्या त्याच्या कारकिर्दीतील शेवटची कसोटी मालिका खेळत आहे, जी पाकिस्तानविरुद्ध सुरू आहे. या मालिकेत वॉर्नरने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे.

Australia vs Pakistan : वॉर्नरने मोडला स्‍टीव्‍ह वॉचा विक्रम मोडित

पाकिस्‍तान विरुद्धच्‍या कसोटीत डेव्हिड वॉर्नरने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. ऑस्ट्रेलियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. वॉर्नरने आतापर्यंत ऑस्ट्रेलियासाठी एकूण 371 सामने खेळले आहेत आणि 42.56 च्या सरासरीने 18,515 धावा केल्या आहेत. या कालावधीत वॉर्नरने 49 शतके आणि 93 अर्धशतके आहेत. त्याने माजी कर्णधार स्टीव्ह वॉ याचा विक्रम मोडला आहे. स्टीव्ह वॉ याने आपल्या कारकिर्दीत एकूण 493 सामने खेळले आणि 41.65 च्या सरासरीने 18,496 धावा केल्या होते.त्‍याने 35 शतके आणि 95 अर्धशतके झळकावली होती. ( David Warner second highest run scorer for australia )

ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा कोणत्‍या फलंदाजाच्‍या नावावर?

ऑस्‍ट्रेलिया क्रिकेट संघासाठी सर्वाधिक धावा करण्‍याचा विक्रम रिकी पाँटिंग याच्‍या नावावर आहे. त्‍याने २७३६८ धावा केल्‍या आहेत. रिकी पाँटिंग याने एकूण 559 सामने खेळले, ज्यात त्याने 45.84 च्या सरासरीने 27,368 धावा केल्या. या काळात पाँटिंगने एकूण 70 शतके आणि 146 अर्धशतके झळकावली होती.

पाकिस्‍तानसाठी दुसरा कसोटी सामना महत्त्‍वाचा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानला ३६० धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. दुसरा कसोटी सामना आजपासून (दि.२६) मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर सुरू झाला आहे. पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत मालिकेत कायम राहण्यासाठी पाकिस्तानला हा सामना जिंकावा लागणार आहे.

ऑस्ट्रेलियाचे दोन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली, पण त्याचे मोठ्या डावात रूपांतर करता आले नाही. उपाहारापूर्वी डेव्हिड वॉर्नर ३८ धावा करून बाद झाला आणि उपाहारानंतर उस्मान ख्वाजाही ४२ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news