‘टेस्ट चॅम्पियनशिप’च्या गुणतालिकेत टीम इंडिया अव्‍वलस्‍थानी! ऑस्ट्रेलियाचा पाकविरुद्ध विजय भारताच्या पथ्यावर | पुढारी

'टेस्ट चॅम्पियनशिप'च्या गुणतालिकेत टीम इंडिया अव्‍वलस्‍थानी! ऑस्ट्रेलियाचा पाकविरुद्ध विजय भारताच्या पथ्यावर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ऑस्‍ट्रेलियाने तीन सामन्‍यांच्‍या कसोटी मालिकेतील पहिल्‍या सामन्‍यात पाकिस्‍तानचा ३६० धावांनी पराभव केला आहे. ऑस्‍ट्रेलियाचा हा विजय भारताच्‍या पथ्‍यावर पडला असून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुण तालिकेत टीम इंडिया अव्‍वलस्‍थानी पोहचली आहे. भारताने पाकिस्तानला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे. दोन्‍ही संघांचे गुणांची टक्केवारी समान म्‍हणजे (६६.६७ ) असली तरी टीम इंडियाचा कसोटी सामन्‍यात पराभव झालेला नाही. त्यामुळे भारताने पाकिस्‍तानला गुणतालिकेत पिछाडीवर टाकले आहे. मात्र हे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५ चे प्रारंभिक टप्‍पे असून, जसे पुढील दोन वर्षांमध्‍ये कसोटी सामने होतील तसे गुणतालिकेतील बरेच बदल दिसून येतील. ( World Test Championship 2023-25 )

ऑस्‍ट्रेलिया विरुद्‍धच्‍या मालिकेतील पहिला सामना खेळण्‍यापूर्वी टेस्ट चॅम्पियनशिपमध्‍ये पाकिस्तानच्‍या गुणांची टक्केवारी 100 होती. मात्र मालिकेतील पहिल्याच कसोटीतील पराभवानंतर त्याच्या गुणांची टक्केवारी ६६.६७ वर घसरली आहे.

World Test Championship 2023-25 : पाकिस्तानचा 360 धावांनी पराभव

तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पर्थमध्ये पाकिस्तानचा 360 धावांनी पराभव केला. कांगारूंच्या या विजयाचा भारतीय संघाला फायदा झाला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये टीम इंडिया अव्वल स्थानावर पोहोचली आहे. भारताने पाकिस्तानला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे. दोघांची पॉइंट टक्केवारी समान असली तरी टीम इंडियाचा पराभव झालेला नाही. त्यामुळे भारत पहिल्या क्रमांकावर आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवामुळे पाकिस्तान संघ दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. ऑस्ट्रेलिया पाचव्या स्थानावर आहे. सध्याची जागतिक कसोटी चॅम्पियनशिप २०२३-२५ मध्‍ये होणार्‍या सामन्‍यांचा भाग आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामना 2025 मध्ये खेळवला जाईल. गुणांच्या टक्केवारीनुसार अव्वल दोन क्रमांकाचे संघ अंतिम फेरीत खेळतील. मात्र हे अद्याप प्रारंभिक टप्पे आहेत आणि भविष्यात बरेच बदल दिसून येतील.

आता पहिल्याच कसोटीतील पराभवानंतर पाकिस्‍तानच्‍या गुणांची टक्केवारी ६६.६७ वर घसरली आहे. पाकिस्तानी संघाने दोन मालिकांमध्ये तीन कसोटी सामने खेळले आहेत. त्यांनी श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी जिंकल्या होत्या. त्याचवेळी आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. संघाचे दोन विजय आणि एक पराभवासह 24 गुण आहेत. त्याच वेळी, भारतीय संघ आता दोन कसोटी सामने (वेस्ट इंडिज) खेळला आहे. टीम इंडियाने एक जिंकला आहे तर दुसरा ड्रॉ राहिला आहे. अशा स्थितीत भारतीय संघाच्या नावावर एकही पराभव नाही. टीम इंडिया 16 गुण आणि 66.67 पॉइंट टक्केवारीसह अव्वल स्थानावर आहे.

World Test Championship 2023-25 : न्‍यूझीलंड तिसर्‍या स्‍थानी

न्यूझीलंडची पॉइंट टक्केवारी 50 आहे आणि ती तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर बांगलादेशचा संघ केवळ 50 गुणांच्या टक्केवारीसह चौथ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया ४१.६७ गुणांच्या टक्केवारीसह पाचव्या तर वेस्ट इंडिज १६.६७ गुणांच्या टक्केवारीसह सहाव्या स्थानावर आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप २०२३-२५ साठी अन्‍य संघांच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत सर्वाधिक सहा कसोटी सामने खेळले आहेत. त्यांनी तीन जिंकले, तर दोनमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. एक सामना अनिर्णित राहिला, त्यामुळे त्यांचे 30 गुण झाले. इंग्लंड 15 गुणांच्या टक्केवारीसह सातव्या स्थानावर आहे. या चक्रात इंग्लंडने पाच कसोटी सामने खेळले आहेत. दोन जिंकले आणि दोन सामन्‍यात पराभव झाला आहे. एक सामना अनिर्णित राहिला आहे. इंग्लंडचे नऊ गुण आहेत. श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका संयुक्तपणे आठव्या क्रमांकावर आहेत. दोन्ही संघांच्‍या गुणांची टक्केवारी शून्य आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button