Suryakumar Yadav | रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर सूर्यकूमारची पोस्ट चर्चेत

Suryakumar Yadav | रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर सूर्यकूमारची पोस्ट चर्चेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2024 चा हंगाम सुरू होण्याआधी मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी एक धक्कादयक माहिती समोर आली आहे. मुंबईचा नियमित कर्णधार रोहित शर्मा याच्याकडील संघाची कर्णधार पदाची धुरा आता गुजरातकडून संघात पुनरागमन केलेल्या हार्दिक पंड्याकडे दिली आहे. या निर्णयाचे स्वागत केले आहे तर बऱ्याच लोकांनी हा निर्णय धक्कादायक असल्याचे सांगितले आहे. (Suryakumar Yadav)

आयपीएल 2024 च्या लिलावापूर्वी हार्दिक पंड्याने नाट्यमय पद्धतीने मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन केले. या बद्दल मुंबईने अधिकृत माहिती देखील दिली. हार्दिकच्या संघात येण्याने मुंबईचा कर्णधार कोण? रोहित की हार्दिक असा प्रश्न मुंबईच्या चाहत्यांना होता. याबाबत संघाने आपल्या सोशल मीडियावर हार्दिक संघाचा नवीन कर्णधार असल्याचे जाहीर केले. यासह मुंबईने आपल्या सोशल मीडियावर रोहितचा भावनिक व्हिडिओ शेयर करत त्याने संघासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानले. (Suryakumar Yadav)

या निर्णयामुळे क्रिकेटच्या चाहत्यांनी धक्का बसला. मुंबई असा निर्णय चाहत्यासाठी अनपेक्षित होता. त्यामुळे या निर्णयाबद्दल चाहत्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये काही चाहत्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. तर, काही चाहत्यांनी या निर्णयाबद्दल आपला संताप व्यक्त केला आहे.

मुंबईला पाच वेळा स्पर्धेचे जेतेपद पटकावून देणाऱ्या रोहितकडून कर्णधार पदावरून हटवल्यामुळे संघाला चांगलाच फटका बसला आहे. या निर्णयाची माहिती अधिकृतरित्या पोस्ट करताच मुंबईच्या इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाऊंटला 4 लाखांपेक्षा अधिक लोकांनी अनफॉलो केले आहे.

या निर्णयामुळे लाखो चाहत्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये मुंबईचा स्टार फलंदाज सुर्यकुमार यादवनेही आपल्या भावना सोशल मी़डियावर व्यक्त केल्या आहेत. सुर्यकुमारने आपल्या इन्टाग्राम आणि एक्स अकांऊटवर ब्रोकन हार्टचा इमोजी शेयर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यामुळे हार्दिककडे संघाची धुरा दिल्याने सूर्या (Suryakumar Yadav) नाराज असल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news