Arvind Kejriwal : केजरीवाल १९ डिसेंबरपासून करणार विपश्यना; १० दिवस राजकारणापासून राहणार दूर | पुढारी

Arvind Kejriwal : केजरीवाल १९ डिसेंबरपासून करणार विपश्यना; १० दिवस राजकारणापासून राहणार दूर

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) १९ ते ३० डिसेंबर या कालावधीत विपश्यना ध्यानासाठी (Vipassana meditation) जाणार आहेत. केजरीवाल दरवर्षी विपश्यनेसाठी जातात. यावर्षीही ते विपश्यनेसाठी १० दिवस राजकारणापासून लांब राहणार आहेत.

मुख्यमंत्री केजरीवाल (Arvind Kejriwal) २०२१ मध्ये जयपूरमध्ये विपश्यनेसाठी (Vipassana meditation) गेले होते. तेथील कॅम्पमध्ये त्यांनी १० दिवस घालवले होते. त्यावेळी केजरीवाल कोणत्याही राजकीय कार्यक्रमास उपस्थित राहिले नव्हते. तसेच पक्षाच्या कोणत्याही नेत्यांना किंवा अधिकाऱ्यांना भेटले नाहीत. केजरीवाल यांनी याआधी धर्मकोट, नागपूर आणि बेंगळुरुमधील अनेक विपश्यना सत्रांमध्ये भाग घेतला आहे.

विपश्यना (Vipassana meditation) ही एक प्राचीन भारतीय ध्यान पद्धत आहे, ज्यामध्ये सहभागी लोक काही काळ प्रसार माध्यम किंवा टीव्ही , फोन या सगळ्यांच माध्यमांपासून दूर राहतात. तसेच, संवाद किंवा सिग्नलद्वारे कोणी कोणाशीही बोलू शकत नाही.

Back to top button