ऋषभ पंत पुढील महिन्यात मैदानावर? | पुढारी

ऋषभ पंत पुढील महिन्यात मैदानावर?

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतीय चाहते ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहे, तो दिवस 2024 मध्ये उजाडणार आहे. भारताचा स्टार यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत लवकरच मैदानावर उतरणार आहे. तो जानेवारी 2024 मध्ये भारत-अफगाणिस्तान टी-20 मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो.

दिल्ली कॅपिटल्सच्या माजी कर्णधाराचा डिसेंबर 2022 मध्ये कार अपघात झाला आणि तेव्हापासून तो क्रिकेटपासून दूर आहे. ऋषभ पुनरागमनासाठी कठोर मेहनत घेत आहे. तो चाहत्यांच्या त्याच्या प्रकृतीच्या सुधारणेचे अपडेटस् वेळोवेळी देत असतो आणि आता त्याने नेटस्मध्ये थोडा थोडा सरावही सुरू केला आहे. ऋषभ जानेवारी 2024 मध्ये भारत-अफगाणिस्तान टी-20 मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो. पण, आयपीएलमध्ये त्याने खेळावे यासाठी दिल्ली कॅपिटल्सने वेगळी रणनीती आखली आहे. ऋषभला ते इम्पॅक्ट खेळाडू म्हणून मैदानावर उतरवू शकतात.

Back to top button