Team India South Africa Tour : टीम इंडियाची घोषणा, द. आफ्रिका दौर्‍यातील तीन मालिकांसाठी तीन कर्णधार | पुढारी

Team India South Africa Tour : टीम इंडियाची घोषणा, द. आफ्रिका दौर्‍यातील तीन मालिकांसाठी तीन कर्णधार

पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India South Africa Tour : आगामी दक्षिण आफ्रिका दौर्‍यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रमुख फलंदाज विराट कोहली यांनी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून विश्रांती घेतली असून ते कसोटी संघात खेळणार आहेत. गुरुवारी मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी संघाला अंतिम रूप दिले. या दौर्‍यासाठी तीन मालिकेत तीन वेगवेगळे संघ आणि कर्णधार निवडण्यात आले असून कसोटीसाठी रोहित शर्मा, एकदिवसीय मालिकेसाठी के.एल. राहुल तर पहिल्या 3 टी-20 सामन्यासाठी सूर्यकुमार यादव कर्णधार असेल.पाचपैकी शेवटच्या 2 टी-20 सामन्यासाठी नंतर संघ निवडण्यात येईल.

नवीन घोषणेनुसार केएल राहुलकडे वनडेचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. म्हणजेच राहुल एकदिवसीय क्रिकेटचा नवा कर्णधार आणि पुढील वर्ल्ड कपसाठी बीसीसीआयच्या योजनेचा एक भाग बनला आहे. याशिवाय संजू सॅमसन आणि रजत पाटीदार यांचेही वनडे संघात पुनरागमन झाल्याचे झाले आहे. तर साई सुदर्शन हा नवा चेहरा संघात आला आहे. तर मोहम्मद शमीची उपलबध्ता त्याच्या वैद्यकिय अहवालानंतर ठरणार आहे.

दक्षिण आफ्रिका दौर्‍यासाठी निवडण्यात आलेले संघ असे (Team India South Africa Tour)

3 टी-20 सामने :

यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.

एकदिवसीय मालिका :

ऋतुराज गायकवाड, साईसुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार, विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, दीपक चहर.

कसोटी मालिका :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (विकेटकीपर), केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद. शमी (मेडिकल फिटनेसवर अवलंबून), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसीध कृष्णा.

एक महिन्याचा व्यस्त कार्यक्रम (Team India South Africa Tour)

भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा 10 डिसेंबरपासून सुरू होत आहे. या एका महिन्यात दोन्ही संघ तीन टी-20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहेत. भारतीय संघ 6 डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे.

दक्षिण आफ्रिका दौर्‍यासाठी भारतीय संघाचे पूर्ण वेळापत्रक –

पहिला टी-20- 10 डिसेंबर
दुसरा टी-20- 12 डिसेंबर
तिसरा टी-20- 14 डिसेंबर

पहिली वनडे – 17 डिसेंबर
दुसरी वनडे- 19 डिसेंबर
तिसरी वनडे- 21 डिसेंबर

पहिली कसोटी- 26-30 डिसेंबर
दुसरी कसोटी- 3-7 जानेवारी

 

Back to top button