BAN vs NZ Test : बांगलादेशची द्विशतकी आघाडी! न्यूझीलंड बॅकफुटवर

BAN vs NZ Test : बांगलादेशची द्विशतकी आघाडी! न्यूझीलंड बॅकफुटवर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : BAN vs NZ Test : बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटीत सामना रंजक बनला आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत यजमान बांगलादेशने आपल्या दुसऱ्या डावात 3 गडी गमावून 212 धावा केल्या. अशा स्थितीत त्यांनी पाहुण्या किवी संघाविरुद्ध पहिल्या डावाच्या आधारे 205 धावांची आघाडी घेतली.

बांगलादेशच्या डावाची सुरुवात काही खास झाली नाही. संघाचे दोन्ही सलामीवीर 26 धावांवर बाद झाले. झाकीर हसन (17) आणि महमुदुल हसन जॉय (8) यांना स्वस्तात माघारी पाठवण्यात किवी गोलंदाजांना यश आले. पण यानंतर नजमुल हुसेन शांतो आणि मोमिनुल हक यांनी तिसर्‍या विकेटसाठी नाबाद 96 धावांची भागीदारी करत संघाची धुरा सांभाळली.

शांतोचे कसोटीतील पाचवे शतक

शांतोने निर्णायक वळणावर शतक झळकावून बांगलादेशचे सामन्यात कमबॅक केले. त्याचे हे कसोटी कारकिर्दीतील 5वे शतक ठरले. 53.89 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना त्याने 193 चेंडूत 104 धावा केल्या. या खेळीत त्याने 10 चौकार मारले. त्याला रहिमची (नाबाद 43) चांगली साथ मिळाली आहे.

तिसरा दिवस किवी गोलंदाजांसाठी संघर्षाचा गेला. त्यांना आपल्या मा-याच्या जोरावर यजमान संघाचा केवळ एकच फलंदाज बाद करता आला. एजाज पटेलने एकमेव विकेट घेतली. यादरम्यान त्याने 23 षटकात 94 धावाही दिल्या. इतर दोन फलंदाज हे धावबाद झाले. टीम साऊदी, काइल जेमिसन, इश सोधी आणि ग्लेन फिलिप्स हे बळी मिळवण्यात अपयशी ठरले.

तत्पूर्वी, तिसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत बांगलादेशने न्यूझीलंडचा पहिला डाव 317 धावांत गुंडाळला. तिसऱ्या दिवशी आठ गडी गमावत 268 धावांच्या पुढे खेळताना न्यूझीलंडचा टीम साऊदी आणि आणि काइल जेमिसन या जोडीने संघाला 300 धावांच्या पुढे नेले आणि संघाला सात धावांची आघाडी मिळवून दिली. साऊदीने 62 चेंडूत 35 आणि जेमिसनने 70 चेंडूत 23 धावा केल्या. या दोघांचा अडसर मोमिनुल हकने दूर केला आणि किवींचा डाव संपुष्टार आणला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news