Hardik Pandya | IPL मधील मोठी डील?, हार्दिक पंड्या ‘गुजरात’ सोडून ‘मुंबई इंडियन्स’मध्ये परतणार

Hardik Pandya | IPL मधील मोठी डील?, हार्दिक पंड्या ‘गुजरात’ सोडून ‘मुंबई इंडियन्स’मध्ये परतणार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : आगामी इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या हंगामात स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya)  त्याचा सध्याच्या संघ गुजरात टायटन्स (GT) ची साथ सोडून त्याचा माजी फ्रँचायझी मुंबई इंडियन्समध्ये परत येणार आहे, असे वृत्त ESPNcricinfo ने दिले आहे. हा करार सर्व रोख रकमेचा असेल. ज्याअंतर्गत मुंबई इंडियन्स फ्रँचायझी ३० वर्षीय पंड्याचा पगार आणि अज्ञात ट्रान्सफर फी म्हणून १५ कोटी रुपये गुजरात टायटन्सला देणार आहे. हार्दिकला ट्रान्सफर फीच्या ५० टक्क्यांपर्यंत कमाई करायची आहे, असेही वृत्तात पुढे म्हटले आहे.

संबंधित बातम्या 

जर हा करार झाल्यास पंड्या आयपीएलच्या इतिहासात एका खेळाडूसाठी केलेला सर्वात मोठा व्यवहार असेल. दरम्यान, दोन्ही फ्रँचायझींनी यावर अद्याप कोणतेही निवेदन जारी केलेले नाही.

आयपीएल २०१४ च्या हंगामासाठी १९ डिसेंबर रोजी दुबईत लिलाव होणार आहे. त्याआधी पंड्या गुजरात सोडून मुंबईच्या संघात वापसी करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.

अष्टपैलू खेळाडू पंड्याच्या नेतृत्त्वाखालील गुजरात टायटन्सने आयपीएलच्या २०२२ हंगामात विजेतेपद मिळवले आणि राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या अंतिम सामन्यात तो 'प्लेअर ऑफ द मॅच' ठरला होता.

आयपीएलच्या मागील हंगामात गुजरात टायटन्सने त्यांच्या पहिल्या दोन हंगामात दुसऱ्यांदा आयपीएल अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. पण, २०२३ मध्ये त्यांना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला आणि ते उपविजेते म्हणून समाधान मानावे लागले.

याआधी रविचंद्रन अश्विन अशाच पद्धतीने पंजाब किंग्जमधून दिल्ली कॅपिटल्समध्ये आला होता. पंड्या आता गुजरात संघातून मुंबईत संघात दाखल झाल्यास तो तिसरा कर्णधार बनेल. हार्दिकने (Hardik Pandya)  २०१५ च्या हंगामात पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने १२३ सामने खेळले आहेत ज्यात त्याने ५३ विकेट्स घेतल्या आहेत आणि १३९.८९ च्या स्ट्राइक रेटने २,३०९ धावा केल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news