Rohit Sharma : रोहित शर्मा टी-२० मधून लवकरच निवृत्त होणार? | पुढारी

Rohit Sharma : रोहित शर्मा टी-२० मधून लवकरच निवृत्त होणार?

मुंबई  वृत्तसंस्था : भारताचा वन-डे व कसोटी क्रिकेटमधील कर्णधार रोहित शर्मा आणखी टी-२० क्रिकेट खेळणार नाही आणि दोन दिवसांपूर्वी संपन्न झालेल्या वन-डे विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच त्याने याबाबत नियामक मंडळातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. (Rohit Sharma)

रोहित शमनि नोव्हेंबर २०२२ मध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेतील सेमीफायनल एक्झिटनंतर एकही टी- २० सामना खेळलेला नाही. त्यानंतर हार्दिक पंड्यानेच टी-२० मध्ये बहुतांशी सामन्यांत नेतृत्वाची धुरा सांभाळली आहे. ३६ वर्षीय रोहित शनि आतापर्यंत १४८ टी-२० सामने खेळले असून, यात १४० चा स्ट्राईकरेट व ४ शतकांसह ३,८५३ धावा फटकावल्या आहेत. सध्याच्या स्थितीत तिन्ही क्रिकेट प्रकारात खेळत राहणे, तसेच दोन महिने ‘आयपीएल’ व डिसेंबर २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत ७ कसोटी खेळणे अशक्यप्राय आहे आणि रोहितचा यातही कसोटी क्रिकेटवर फोकस असणे साहजिक आहे.

हेही वाचा 

Back to top button