Worldcupfinal2023 : भारताच्या पराभवावर बाबर आझमसह पाकिस्तानचे क्रिकेटपटू काय म्हणाले? | पुढारी

Worldcupfinal2023 : भारताच्या पराभवावर बाबर आझमसह पाकिस्तानचे क्रिकेटपटू काय म्हणाले?

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा पराभव करून ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक जिंकला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात कांगारूंनी सहा गडी राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियानेही भारताची सलग १० विजयांची मालिका खंडित केली. या सामन्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. त्याचवेळी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमनेही अंतिम सामन्यानंतर पोस्ट केली आहे.

संबंधित बातम्या : 

भारताच्या पराभवावर पाकिस्तानच्या अनेक क्रिकेटपटूंनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. कर्णधार बाबरने इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन! अंतिम फेरीत उत्कृष्ट कामगिरी केली.” वसीम अक्रमने लिहिले की, “वर्ल्ड चॅम्पियन बनल्याबद्दल ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन. ऑसी ऑसी ऑसी ओये ओये ओये.” तसेच, त्याने या पोस्टमध्ये शनैराला टॅग केले आहे. शनैरा ही वसीम अक्रमची पत्नी आहे. ती ऑस्ट्रेलियन नागरिक आहे.

त्याचवेळी शोएब अख्तरने ट्विटरवर लिहिले की, ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक जिंकला आहे. १९८७ पासून जिंकत आहेत. भारत फायनल पर्यंत सुदैवाने नाही तर चांगला खेळ करून पोहोचला होता. सलग १० सामने जिंकून झुंज देत टीम इंडिया तिथे पोहोचली. विकेट पाहून वाईट वाटले. मला वाटले की फायनलसाठी यापेक्षा चांगली विकेट असू शकते. विकेट थोडी वेगवान किंवा बाउन्स झाली असती, जर तुम्ही लाल मातीत सामना खेळला असता तर तुम्हाला टॉसवर इतके अवलंबून राहावे लागले नसते. नाणेफेक हरल्याबरोबर फिरकीपटूंकडून ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अडकवू, असे त्यांना वाटले, ते होऊ शकले नाही. टीम इंडियाचा दृष्टिकोन मला आवडला नाही. भारताने विश्वचषक गमावला आहे. जर त्यांना कोणी रोखू शकत होते तर तो ऑस्ट्रेलियाच होता.

वकार युनूसनेही ऑस्ट्रेलियाचा विजय साजरा केला. त्याने लिहिले- “तुम्हाला आधीही सांगितले होते. पॅट कमिन्स आणि त्याच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन. ऑसी ऑसी ऑसी ओए ओए ओए.”

कामरान अकमलने आपल्या ट्विटर पोस्टमध्ये लिहिले की, विश्वचषक जिंकल्याबद्दल ऑस्ट्रेलियन संघाचे अभिनंदन. हा विश्वचषक तुमच्यासाठी चढ-उतारांनी भरलेला होता आणि शेवटी तुम्ही चॅम्पियन आहात. हार्दिक शुभेच्छा टीम इंडिया. या विश्वचषकात तुम्ही उत्कृष्ट क्रिकेट खेळलात.

मोहम्मद रिझवाननेही भारताच्या पराभवानंतर पोस्ट करत लिहिले – संपूर्ण विश्वचषकात भारताने ज्या प्रकारे क्रिकेट खेळले ते आश्चर्यकारक होते. पण ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत उत्कृष्ट क्रिकेट खेळले. सहाव्यांदा वर्ल्ड चॅम्पियन झाल्याबद्दल ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन.

पाकिस्तानचा नवीन टी २० कर्णधार शाहीन शाह आफ्रिदीने लिहिले- विश्वचषक विजेतेपद जिंकल्याबद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे खूप खूप अभिनंदन. अंतिम दिवशी निश्चितपणे सर्वोत्तम संघ म्हणून उदयास आला. भारताचे नशीब वाईट होते, पण संपूर्ण स्पर्धेत संघाने चमकदार कामगिरी केली.

पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकने लिहिले – ऑस्ट्रेलिया टीम जिंकण्यास पात्र आहे. टीम इंडियाने संपूर्ण विश्वचषकात चमकदार कामगिरी केली, पण मी नेहमी म्हणत आलो की ऑस्ट्रेलिया दबावाखाली सर्वोत्तम कामगिरी करते आणि अंतिम फेरीत त्यांनी ते पुन्हा एकदा सिद्ध केले.

हेही वाचा :

Back to top button