पुढारी ऑनलाईन डेस्क : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा ६ विकेट्सने पराभव करत भारताचे स्वप्नभंग केले. कांगारूंनी सहाव्यांदा विश्वचषक आपल्या नावावर केला आहे. (World Cup 2023 Final) या पराभवानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने भावनिक पोस्ट केली आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की,"खेळाडू, चाहते आणि हितचिंतक यांच्या यातना आणि त्यांना काय त्रास होत असेल याची मी कल्पना करू शकतो." (World Cup 2023)
सचिन तेंडूलकरने आपल्या 'X' खात्यावर पोस्ट करत म्हटलं आहे की, सहाव्या विश्वचषक विजयाबद्दल ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन. सर्वात मोठ्या व्यासपीठावर सर्वात महत्त्वाच्या दिवशी त्यांनी चांगले क्रिकेट खेळले. टीम इंडियासाठी शुभेच्छा, अन्यथा स्टर्लिंग स्पर्धेत फक्त एक वाईट दिवस हृदयद्रावक असू शकतो. खेळाडू, चाहते आणि हितचिंतक यांच्या यातना आणि त्यांना काय त्रास होत असेल याची मी कल्पना करू शकतो. पराभव हा खेळाचा एक भाग आहे परंतु आपण लक्षात ठेवूया की या टिमने संपूर्ण स्पर्धेत आपल्यासाठी सर्व प्रचत्नाने दिले आहे."
विश्वचषकाच्या फायनलमध्ये नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने गोलंदाजीचा निर्णय घेतला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी (19 नोव्हेंबर) कांगारू संघाने भारतीय संघाचा सहा गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकून सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. ऑस्ट्रेलियाच्या या विजयानंतर भारतीय खेळाडूंसह अनेक क्रिकेटप्रेमींना अश्रू अनावर झाले.
हेही वाचा