पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याच्या पुनरागमनाची किक्रेटप्रेमींना प्रतीक्षा आहे. १० महिन्यांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात ऋषभ पंत जखमी झाला होता. यानंतर तो बराच काळ क्रिकेटपासून दूर होता. दुखापतीमुळे पंतला भारतात सुरू असलेल्या विश्वचषक संघात निवड झाली नव्हती. ऋषभ आता दुखापतीतून जवळपास सावरला आहे. आगामी आयपीएल 2024 साठी आम्ही त्याच्याशी बोलत आहोत. तो लवकरच मैदानावर परतेल, असे संकेत दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक सौरव गांगुली यांनी दिले आहेत. (Rishabh Pant )
दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक सौरव गांगुली इंडिया टुडेशी बोलताना म्हणाले, "ऋषभ पंतची प्रकृती चांगली आहे. सध्या तो आमच्यासोबत असून पुढच्या मोसमापासून खेळणार आहे. आगामी लिलाव लक्षात घेऊन आम्ही पंतसोबत संघाबाबत चर्चा केली. संघाचा कर्णधार असल्याने त्याच्याशी चर्चा करणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे." (Rishabh Pant )
ऋषभ पंता गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एका रस्ता अपघातात जखमी झाला होता. यामधून तो पूर्णपणे बरा झाला आहे.
हेही वाचा :