Sharad Pawar vs Ajit Pawar | झोमॅटो बॉय, सेल्समन राजकीय पदे राष्ट्रवादीत आहेत का?; शरद पवार गटाचा खळबळजनक दावा

Sharad Pawar vs Ajit Pawar | झोमॅटो बॉय, सेल्समन राजकीय पदे राष्ट्रवादीत आहेत का?; शरद पवार गटाचा खळबळजनक दावा
Published on
Updated on

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि निवडणूक चिन्हावर हक्क करण्यासाठी अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे खोटी कागदपत्रे सादर केली आहेत. झोमॅटो बॉय, सेल्समन, अशी पदे पक्षात दाखविली गेली आहेत, असा खळबळजनक दावा शरद पवार गटाने निवडणूक आयोगासमोर केला. खोट्या कागदपत्रांच्या आधारे आयोगाची दिशाभूल केल्याबद्दल अजित पवार गटाविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणीही शरद पवार गटाने केली आहे. या प्रकरणात आता दिवाळीनंतर 20 नोव्हेंबरपासून सलग सुनावणी होणार आहे. (Sharad Pawar vs Ajit Pawar)

संबंधित बातम्या 

राष्ट्रवादी काँग्रेसवर ताबा मिळविण्यासाठी शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यातील कायदेशीर लढाईला 6 ऑक्टोबरला निवडणूक आयोगासमोर सुरुवात झाली होती. त्यानंतर काल (दि.9) तिसरी सुनावणी झाली. निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या दस्तावेजांवरून अजित पवार गटाला शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी कोंडीत पकडले. या सुनावणीसाठी स्वतः शरद पवार आयोगासमोर हजर झाले होते. अजित पवार गटातर्फे मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद केला. ही सुनावणी जवळपास दीड तास चालली.

अजित पवार गटाने सादर केलेली चुकीची प्रतिज्ञापत्रे सिद्ध करण्यासाठी अभिषेक मनू सिंघवी यांनी 24 विभागांत कागदपत्रांची मांडणी केली आणि ती युक्तिवादादरम्यान सादर केली. अजित पवार गटाने खोटी कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. खोटी कागदपत्रे सादर करण्याचे हे अत्यंत गंभीर प्रकरण असून, निवडणूक आयोगाने यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे, असाही युक्तिवाद अभिषेक मनू सिंघवी यांनी यावेळी केला.

दरम्यान, शरद पवार गटाच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या शपथपत्रांवरही युक्तिवाद झाला. शरद पवार गटाच्या वतीने 30 ऑक्टोबरला जवळपास ट्रक भरून शपथपत्रे दाखल करण्यात आली आहेत. यामध्ये जवळपास साडेसहा लाख शपथपत्रे दाखल करण्यात आली आहेत. (Sharad Pawar vs Ajit Pawar)

शरद पवार गटाचा युक्तिवाद

  • झोमॅटो बॉय, सेल्समन, हाऊस वाईफ अशी पदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाहीत
  • 73 वर्षांच्या व्यक्तीला पक्षाच्या युवक आघाडीचा तालुकाध्यक्ष दाखवले
  • आधार कार्डवरील वय 10, 12 वर्षे असलेल्या मुलांना दाखवले पदाधिकारी
  • दाखल करण्यात आलेल्या शपथपत्रांमध्ये अनेक सदस्यांचा मृत्यू झालेला
  • अजित पवार गटाने सादर केलेली कागदपत्रे ही निवडणूक आयोगाची फसवणूक
  • याचा अर्थ त्यांच्याकडे कोणतीही खरी कागदपत्रे नाहीत

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news