Virat Kohli : शून्‍यवर तंबूत! विराटच्‍या नावावर नामुष्‍कीजनक रेकॉर्डची नोंद

Virat Kohli : शून्‍यवर तंबूत! विराटच्‍या नावावर नामुष्‍कीजनक रेकॉर्डची नोंद
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : वन-डे वर्ल्डकपमध्ये विराटच्या बॅटमधून आणखी एक शानदार खेळी पाहायला मिळेल या आशेने लखनौच्या एकना स्टेडियमवर पोहोचलेल्या चाहत्यांना आज (दि.२९) निराश व्हावे लागले. विराट कोहली आयसीसी वर्ल्डकप 2023 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला आपल्या 9 चेंडूच्या खेळीत भोपळाही फोडता आला नाही. सामन्यात विराट डेव्हिड विलीच्या चेंडूवर बेन स्टोक्सकडे सोपा झेल देऊन तंबूत परतला. (Virat Kohli Record)

वन-डे वर्ल्डकप स्पर्धेत फॉर्ममध्ये दिसणारा विराट इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात सुरुवातीपासूनच अडचणीत दिसत होता. ज्या षटकात डेव्हिड विलीने विराटला बाद केले. त्या षटकात विराटवरील दडपण स्पष्टपणे दिसत होते. विराट मोठा फटका मारण्यासाठी पुढे क्रिज सोडून पुढे आला परंतु, चेंडूचा बॅटशी योग्य संपर्क झाला नाही आणि बेन स्टोक्सने त्याचा सोपा झेल घेतला. 9 चेंडूंचा सामना करून  कोहली शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला.   (Virat Kohli)

वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच विराट शून्यावर बाद

वन-डे वर्ल्डकपमध्ये विराट कोहली खाते न उघडता बाद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यासह भारतासाठी पहिल्या सात फलंदाजांपैकी विराट सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा संयुक्त पहिला फलंदाज ठरला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोहली ३४व्यांदा शून्यावर बाद झाला आहे. कोहलीसोबत सचिन तेंडुलकरही 34 वेळा शून्यावर बाद झाला आहे. तर वीरेंद्र सेहवाग 31 वेळा शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news