Asian Para Games | हात नसले तरी ‘स्वप्नांना पंख’ असतात; पॅरा गेम्समध्ये शीतल देवीचा ‘सुवर्णवेध’ | पुढारी

Asian Para Games | हात नसले तरी 'स्वप्नांना पंख' असतात; पॅरा गेम्समध्ये शीतल देवीचा 'सुवर्णवेध'

पुढारी ऑनलाईन डेस्क : एशियन पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंकडून दमदार कामगिरीसह पदकांची कमाई सुरूच आहे. दरम्यान, आज चौथ्या दिवशी तिरंदाज शीतल देवी आणि राकेश कुमार या जोडीने सुवर्णपदकाची कमाई केली. या दोघांनी कपाऊंड ओपन मिश्र दुहेरीत भारताला पहिले सुवर्ण जिंकून दिले. भारताच्या या जोडीने चीनच्या जोडीचा १५१-१४९ असा पराभव करत बाजी मारली. पॅरा गेम्समध्ये सुवर्णपदकावर मोहर उमटवत तिने हात नसले तरी स्वप्नांना पंख असतात हे सिद्ध केले आहे. (Asian Para Games)

पॅरा गेम्समध्ये याआधी शीतल देवीने सरिता सोबत महिला दुहेरी कंपाऊंड इव्हेंटमध्ये रौप्यपदक जिंकले होते. आज तिने मिश्र दुहेरीत सुवर्णपदकाला गवसणी घातली. हात अथवा पाय नसले तरी स्वप्नांना पंख असतात. टीम इंडियातील १६ वर्षीय तिरंदाज शीतल देवी ही जुलैमध्ये पॅरा वर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी पहिली हात नसलेली महिला बनली होती. तिने आता हांगझोऊ आशियाई पॅरा गेम्समध्ये तिच्या सहकाऱ्यासह महिला दुहेरी कंपाऊंडमध्ये रौप्यपदक जिंकले. याबाबत हांगझोऊ चौथ्या आशियाई पॅरा गेम्सने त्यांच्या अधिकृत X हँडलवर पोस्ट करत तिच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. (Asian Para Games)

शीतल देवीने जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील लोई धार या दुर्गम गावातून पुढे येऊन जागतिक स्तरावर तिरंदाजीत नाव कमावले आहे. जम्मूमधील किश्तवाडमधील दुर्गम भागात 16 वर्षीय तरुणीने दैदिप्यमान कामगिरी केली आहे. दृढनिश्चय आणि लवचिकतेच्या जोरावर भारतीय तिरंदाज शीतल देवी हीने जागतिक स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

पीएम मोदींने केले अभिनंदन

यापूर्वी महिला दुहेरी कंपाऊंड स्पर्धेत शानदार रौप्यपदक मिळविल्याबद्दल पीएम मोदी यांनी शीतल देवी आणि सरिता यांचे अभिनंदन केले होते.

पॅरा गेम्समध्ये भारताची ७३ पदकांची कमाई- पीएम मोदींकडून अभिनंदन

जकार्ता २०१८ आशियाई पॅरा गेम्समधील आमचा मागील ७२ पदकांचा विक्रम मोडून, भारताने अभूतपूर्व ७३ पदके जिंकून आणि अजूनही मजबूत करत आशियाई पॅरा गेम्समधली एक अतुलनीय कामगिरी केल्याचे देखील पीएम मोदी यांनी म्हटले आहे. खेळाडूंची बांधिलकी, दृढता आणि उत्कृष्टतेची अटळ मोहीम खरोखरच प्रेरणादायी आहे! ही ऐतिहासिक कामगिरी भावी पिढ्यांना मार्गदर्शक प्रकाश, प्रेरणादायी ठरू दे, असे देखील पीएम मोदी यांनी म्हटले आहे.

हेही वाचा:

Back to top button