AUS vs NED : वॉर्नर-मॅक्सवेलची झंझावाती खेळी, नेदरलॅन्डला ४०० धावांचे आव्हान | पुढारी

AUS vs NED : वॉर्नर-मॅक्सवेलची झंझावाती खेळी, नेदरलॅन्डला ४०० धावांचे आव्हान

पुढारी ऑनलाईन डेस्क : सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने नेदरलॅन्डसला 400 धावांचे लक्ष्य दिले आहे. ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत आठ गडी बाद 399 धावा केल्या. कांगारू संघासाठी डेव्हिड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी विक्रमी शतके झळकावली. वॉर्नरने सहावे शतक झळकावून माजी कर्णधार रिकी पाँटिंगचा विक्रम मोडीत काढला. विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक शतके झळकावणारा तो ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला. तर, मॅक्सवेलने शेवटच्या षटकांमध्ये झंझावाती खेळी करत अवघ्या 40 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. विश्वचषकात सर्वात कमी चेंडूत शतक झळकावणारा तो खेळाडू ठरला. वॉर्नरने 93 चेंडूत 104 तर मॅक्सवेलने 44 चेंडूत 106 धावा केल्या.

वॉर्नर आणि मॅक्सवेल व्यतिरिक्त स्टीव्ह स्मिथने 71 आणि मार्नस लॅबुशेनने 62 धावा केल्या. जोश इंग्लिशने 14 आणि कर्णधार पॅट कमिन्सने नाबाद 12 धावा केल्या. मिचेल मार्श नऊ धावा करून आणि कॅमेरून ग्रीन आठ धावा करून बाद झाले. मिचेल स्टार्क खातेही उघडू शकला नाही. एडन झाम्पाने एक धाव घेतली. नेदरलँड्सकडून लोगान व्हॅन बीकने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. बास डी लीडने दोन बळी घेतले. तर आर्यन दत्तने एक विकेट घेतली.

हेही वाचा :

Back to top button