Rajkummar Rao : अभिनेता राजकुमार राव निवडणूक आयोगाचा राष्ट्रीय 'आयकॉन' | पुढारी

Rajkummar Rao : अभिनेता राजकुमार राव निवडणूक आयोगाचा राष्ट्रीय 'आयकॉन'

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीपूर्वी अभिनेता राजकुमार राव यांची राष्ट्रीय आयकॉन म्हणून नियुक्ती करणार असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. गुरुवारी यासंदर्भात औपचारिक कार्यक्रम होणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्‍पष्‍ट केले आहे. (Rajkummar Rao)

भारतातील पाच राज्यांमधील 161 दशलक्षाहून अधिक लोक पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदान करतील, अशी घोषणा भारताच्या निवडणूक आयोगाने या महिन्याच्या सुरुवातीला केली होती. मिझोराम राज्‍यात ७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर ९० सदस्यीय विधानसभेच्या छत्तीसगडमध्ये ७ आणि १७ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. (Rajkummar Rao)

Rajkummar Rao : राष्ट्रीय आयकॉनचे काय काम असते.

लोकांना मतदान करण्याबाबत जागरूक करणे. सर्व निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून अनेक उपाययोजना आखल्या जातात. याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम राजकुमार राव करेल. जेव्हा निवडणूक आयोग एखाद्याला आपला राष्ट्रीय आयकॉन बनवतो, तेव्हा त्या सेलिब्रिटीला निवडणूक आयोगासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करावी लागते. हे निवेदन पुढील ३ वर्षांसाठी असते. यानंतर, तो जाहिरातींद्वारे, त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे किंवा इतर कार्यक्रमांद्वारे लोकांना मतदानाबाबत जागरूक करतो. यापूर्वीही निवडणूक आयोगाने अनेक खेळाडू आणि अभिनेत्यांना आपले राष्ट्रीय आयकॉन बनवले आहे.

मध्य प्रदेश आणि तेलंगणामध्ये अनुक्रमे १७ आणि ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. राजस्थानमध्ये यापूर्वी 23 नोव्हेंबरला मतदान होणार होते. आता 25 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी ३ डिसेंबरला होणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनीही सांगितले की, या राज्यांमधील निवडणुकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. 2024 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीपूर्वी या निवडणुका होत आहेत.

 

 

हेही वाचा 

Back to top button