AsianParaGames : २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारताच्या नारायण ठाकुरला कांस्य

AsianParaGames : २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारताच्या नारायण ठाकुरला कांस्य

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशियाई पॅरा गेम्समध्‍ये भारताची विजयी घोडदौड सुरूच आहे. पुरुषांच्या २०० मीटर टी ३५ धावण्याच्या स्पर्धेत नारायण ठाकुरने २९.८३ सेकंद नोंदवत भारतासाठी आणखी एक कांस्यपदक जिंकले. याच स्पर्धेत रवी कुमार ३१.२८ सेकंदांसह पाचव्या स्थानावर राहिला. (AsianParaGames)

आशियाई पॅरा गेम्समध्‍ये तिसऱ्या दिवशी भारताने टेबल टेनिसमध्ये खाते उघडले. टेबल टेनिस महिला एकेरी – वर्ग ४ क्रीडा प्रकारात कांस्यपदक मिळवले.

भालाफेकमध्ये सुमितने रचला इतिहास; सुवर्णला गवसणी

पॅरा आशियाई स्पर्धेत सुमित अंतिल आणि पुष्पेंद्र सिंग यांनी पुरुषांच्या भालाफेक F64 स्पर्धेत भारतासाठी २ पदके जिंकली आहेत. सुमितने ७३.२९ मीटर भाला फेकून सुवर्णपदक पटकावले, तर पुष्पेंद्र सिंगने ६२.०६ मीटरच्या थ्रोसह कांस्यपदक पटकावले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news