Bishan Singh Bedi : जेव्हा सचिनला ‘आऊट’ करण्यासाठी शेन वॉर्नने घेतला होता बिशनसिंग बेदींचा सल्ला | पुढारी

Bishan Singh Bedi : जेव्हा सचिनला 'आऊट' करण्यासाठी शेन वॉर्नने घेतला होता बिशनसिंग बेदींचा सल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचे माजी दिग्गज फिरकीपटू बिशनसिंग बेदी यांचे वयाच्या ७७ वर्षी निधन झाले. बेदी हे भारतीय संघासाठीच नव्हे तर त्यांच्या पिढीतील महान गोलंदाजांपैकी एक होते. एक काळ असा होता की, भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला आऊट करण्यासाठी शेन वॉर्नने बिशनसिंग बेदी यांचा सल्ला घेतला होता. ‘खराब गोलंदाजीसाठी फिल्ड सेट करू नका’, असे बेदी म्हणाले होते. बेदी यांनी गौरव कपूरच्या ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स’ या शोमध्ये हा खुलासा केला. (Bishan Singh Bedi)

“वॉर्नने मला विचारले सचिनला कशी गोलंदाजी करायला हवी? त्यामुळे मी त्याला आऊट कसे करायला हवे? हे सांगितले होते. बेदी वॉर्नला म्हणाले, “सचिला आऊट करण्यासाठी शॉर्ट लेग, स्लीपला फिल्डिंग लावायला पाहिजे. ” या सल्ल्याने आश्चर्यचकित होऊन वॉर्न म्हणाला, ‘तुम्ही विनोद करत आहात का?” (Bishan Singh Bedi)

यानंतर वॉर्नला त्यांनी प्रत्युत्तर दिले की, क्रिकेट हा मनाचा खेळ आहे. मी सांगितलेली फिल्डींग सचिनला आऊट करण्यासाठी नाही तर त्याच्यावर दबाव टाकण्यासाठी होती. शिवाय पुढे बेदी म्हणाले. ‘शक्य असेल तर मिड ऑफला एक फिल्डर असायला हवा. तुझी फिल्डिंग त्याच्या मनात असायला हवी.’ शेन वॉर्नने बिशनसिंग बेंदीचा हा सल्ला ऐकला आणि सचिन याच ट्रिकने आऊट झाला होता.

बिशनसिंग बेदी यांनी सोमवारी (दि.२३) वयाच्या ७७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बेदी यांनी भारतासाठी ७७ सामने खेळले. यामध्ये त्यांनी १३ वेळा चार बळी, १४ वेळा पाच बळी आणि एकदा १० बळी पटकावले होते. त्यांनी संपूर्ण कारकिर्दीतत २७३ बळी घेतले होते.(Bishan Singh Bedi)

हेही वाचलंत का?

Back to top button