Heinrich Klaasen century against england : क्लासेनने केली इंग्लंडची ‘क्लासिक’ धुलाई

Heinrich Klaasen century against england : क्लासेनने केली इंग्लंडची ‘क्लासिक’ धुलाई
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना द. आफ्रिकेच्या फलंदाज क्लासेनने आपली नैसर्गिक खेळी करत इंग्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. उत्‍कृष्‍ट फलंदाजीचे प्रदर्शन करत क्लासेनने ६१ चेंडूमध्ये  शतक पूर्ण केले. यामध्ये त्याने १० चौकार आणि ४ षटकारांची आतषबाजी केली. क्लासेनसह सी व्हॅन डर डुसेन, रीझा हेंड्रिक्स आणि मार्को जॅनसेन यांनी अर्धशतके झळकावली. त्यांच्या या दमदार खेळीमुळे आफ्रिकेने इंग्लंडसमोर ३९९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

 द. आफ्रिकेची फलंदाजी

दक्षिण आफ्रिकेकडून हेनरिक क्लासेनने धडाकेबाज शतक केले. रॅसी व्हॅन डर डुसेन, रीझा हेंड्रिक्स आणि मार्को जॅनसेन यांनी अर्धशतके झळकावली. क्लासेनने ६७ चेंडूत १०९ धावा केल्या. त्याने १२ चौकार आणि ४ षटकार मारले. हेंड्रिक्सने ७५ चेंडूत ८५ धावा केल्या. त्याने ९ चौकार आणि ३ षटकार मारले. मार्को यानसेनने ४२ चेंडूत ७५ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ३ चौकार आणि ६ षटकार मारले. ड्युसेनने ६१ चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीने ६० धावा केल्या. डेव्हिड मिलर ५ धावा करून बाद झाला, क्विंटन डी कॉकने ४ आणि जेराल्ड कोएत्झीने ३ धावा केल्या. केशव महाराज १ धाव घेत नाबाद राहिला. इंग्लंडकडून रीस टोपलीने तीन बळी घेतले. गस अॅटिन्सन आणि आदिल रशीदने प्रत्येकी दोन गडी बाद केले. या  खेळीमुळे आफ्रिकेने इंग्लंडसमोर ३९९ धावांचे लक्ष्य ठेवले.

रीझा हेंड्रिक्स-व्हॅन दर दुसेन जोडीची शतकी  भागिदारी

सामन्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये क्विंटन डी कॉक बाद झाल्यानंतर रीझा हेंड्रिक्स आणि व्हॅन दर दुसेन जोडीने संघाचा डाव सांभाळात दुसऱ्या विकेटसाठी १०० बॉलमध्ये १०३ धावांची भागिदारी रचली. यामध्ये रीझा हेंड्रिक्सने ४८ बॉलमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. तर, व्हॅन दर दुसेनने ४९ बॉलमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. (Heinrich Klaasen century against england)

वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरूद्ध सर्वात मोठी धावसंख्या

या सामन्यात वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेने केला. त्यांनी पाकिस्तानचा विक्रम मोडीत काढला. पाकिस्तानने २०१९ मध्ये आठ विकेट्सवर ३४८ धावा केल्या होत्या. एवढेच नाही तर वनडे क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्धची ही कोणत्याही संघाची सर्वात मोठी धावसंख्या आहे. या बाबतीत दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला मागे टाकले. २०१५ मध्ये न्यूझीलंडने ओव्हलवर पाच विकेट्सवर ३९८ धावा केल्या होत्या.

हेही वाचा ;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news