

पुणे; पुढारी वृत्तसेवा : यजमान भारतीय संघ आज आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या साखळी सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी बांगला देशविरुद्ध आमनेसामने भिडणार आहे. साखळी फेरीतील पहिले तिन्ही सामने जिंकले असल्याने येथे विजयाचा चौकार नोंदवणे, हे रोहितसेनेचे मुख्य लक्ष्य असेल. दुसरीकडे, बांगला देश संघाची कामगिरी 3 सामन्यांत 1 विजय व 2 पराभव, अशी राहिली आहे.
उभय संघांतील आजची लढत येथील गेहुंजे स्टेडियमवर दुपारी 2 पासून खेळवली जाईल. यादरम्यान, पुण्यात सामन्याच्या पूर्वसंध्येला पाच मिनिटे वरुणराजाने हजेरी लावली आणि यामुळे सामन्यात पावसाचा व्यत्यय येऊ शकेल का, अशी साशंकता निर्माण झाली. साहजिकच, आजची लढत निर्विघ्न पार पडण्यासाठी आता वरुणराजाची मेहेरनजर लाभणेही क्रमप्राप्त असणार आहे.
हेही वाचा