विराट कोहली म्हणाला, तुमच्या योगदानाची इतिहास नोंद ठेवेल! | पुढारी

विराट कोहली म्हणाला, तुमच्या योगदानाची इतिहास नोंद ठेवेल!

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री ही जोडी आता टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये पहावयाला मिळणार नाही. विराट कोहलीने टी २० संघाचे कर्णधारपद सोडले आहे. तर रवी शास्त्री आणि त्यांचा सपोर्ट स्टाफ यांचा कार्यकाळ टी २० वर्ल्डकप नंतर संपुष्टात आला आहे. आता टीम इंडियाचे टी २० मधील कर्णधार पद रोहित शर्माकडे आले आहे. तर टीम इंडियाच्या प्रशिक्षणाची धुरा राहुल द्रविड यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची धुरा नवा कर्णधार आणि नवा प्रशिक्षक सांभाळणार आहे. या दौऱ्यासाठी विराट कोहली बरोबरच टीम इंडियातील अनेक महत्वाच्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. दरम्यान, विराट कोहलीने मावळते प्रशिक्षक रवी शास्त्री आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफसाठी एक भावनिक ट्विट केले.

विराट कोहली आपल्या ट्विटमध्ये म्हणतो ‘तुमच्या सर्वांसोबतच्या प्रवासात एक संघ म्हणून तयार झालेल्या सर्व आठवणींसाठी आभार. तुमचे योगदान हे बहूमुल्य होते आणि हे योगदान भारतीय क्रिकेट इतिहास कायम लक्षात ठेवेल. आयुष्यातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.’

हेही वाचा : 

कसा होता विराट कोहली आणि रवी शास्त्रींचा काळ?

रवी शास्त्री यांच्या प्रशिक्षक पदाच्या कार्यकाळात भारकताने ४३ कसोटी सामने खेळले. त्यातील २५ सामने जिंकले तर १३ सामन्यात पराभव झाला. याचबरोबर रवी शास्त्री प्रशिक्षक असताना टीम इंडियाने इंग्लंडमधील कसोटी मालिकेत २ – १ अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतला अखेरचा कसोटी सामना हा पुढच्या वर्षी खेळवला जाणार आहे.

याचबरोबर टीम इंडियाने शास्त्रींच्या कार्यकाळात ७६ एकदिवसीय आणि ६५ सामने खेळले. त्यातील ५१ एकदिवसीय सामन्यात तर ४३ टी २० सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. विराट कोहली आणि रवी शास्त्री या जोडगोळीच्या कार्यकाळात भारताने द्विपक्षीय मालिकांमध्ये धमाकेदार कामगिरी केली. मात्र या जोडीला आयसीसी स्पर्धेत मोठे यश मिळवता आले नाही. त्यांना एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही.

Back to top button