Quinton De Kock : क्विंटन डी कॉकचा डबल धमाका! विश्वचषकात सलग दोन शतके ठोकणारा चौथा खेळाडू

Quinton De Kock : क्विंटन डी कॉकचा डबल धमाका! विश्वचषकात सलग दोन शतके ठोकणारा चौथा खेळाडू

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून खेळणारा दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने (Quinton De Kock) गुरुवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 90 चेंडूत शानदार शतक झळकावले. त्याचे हे 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकातील सलग दुसरे शतक ठरले आहे. डी कॉकने डावाच्या 30व्या षटकात पॅट कमिन्सच्या चेंडूवर षटकार खेचून शतक पूर्ण केले. या वादळी खेळीत त्याने 8 चौकार आणि 5 षटकार ठोकले. याआधी नवी दिल्लीत झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात द. आद्रिकेच्या ओपनर फलंडाजाने 84 चेंडूत 100 धावांची खेळी केली होती. त्यानंतर कांगांरूंविरुद्ध तो 106 चेंडूत 109 धावांची खेळी केल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर बाद झाला.

विश्वचषकात सलग दोन शतके करणारा चौथा खेळाडू (Quinton De Kock)

डी कॉक विश्वचषकात सलग दोन शतके करणारा द. आफ्रिकेचा दुसरा आणि चौथा खेळाडू ठरला. डी कॉकपूर्वी (Quinton De Kock) एबी डिव्हिलियर्स (ab de villiers), कुमार संगकारा, रोहित शर्मा यांनी हा पराक्रम केला आहे. 2011 च्या वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदा एबीडीने सलग दोन शतके फटकावण्याची किमया केली होती. त्यानंतर 2015 मध्ये कुमार संगकाराने सलग चार शतके झळकावून डीव्हिलियर्सला मागे सोडले. यानंतर 2019 मध्ये रोहित शर्मा सलग तीन शतके झळकावण्यात यशस्वी ठरला. अशा परिस्थितीत आता या यादीत क्विंटन डी कॉकच्या नावाचाही समावेश झाला आहे.

विश्वचषकात सलग शतके फटकावणारे फलंदाज

4 शतके : कुमार संगकारा, 2015
3 शतके : रोहित शर्मा, 2019
2 शतके : एबी डिव्हिलियर्स, 2011
2* शतके : क्विंटन डी कॉक, 2023

विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध द. आफ्रिकेच्या फलंदाजांची शतके

101 शतके : हर्शेल गिब्स, लीड्स, 1999
100 शतके : फाफ डु प्लेसिस, मँचेस्टर, 2019
100* शतके : क्विंटन डी कॉक, लखनौ, 2023

वर्ल्ड कपमध्ये द. आफ्रिकेसाठी सर्वाधिक शतके

4 शतके : एबी डिव्हिलियर्स
2 शतके : हाशिम आमला
2 शतके : फाफ डु प्लेसिस
2 शतके : हर्शल गिब्स
2 शतके : क्विंटन डी कॉक

द. आफ्रिकेसाठी सर्वाधिक एकदिवसीय शतके करणारे सलामीवीर

27 शतके : हाशिम आमला
19 शतके : क्विंटन डी कॉक*
18 शतके : हर्शेल गिब्स
13 शतके : गॅरी कर्स्टन
10 शतके : ग्रॅम स्मिथ

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news