Rohit Sharma World Record : ‘वयस्कर रोहित शर्मा’ने मोडला रिकी पाँटिंगचा 12 वर्षांपूर्वीचा विक्रम | पुढारी

Rohit Sharma World Record : ‘वयस्कर रोहित शर्मा’ने मोडला रिकी पाँटिंगचा 12 वर्षांपूर्वीचा विक्रम

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma World Record : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली. यादरम्यान तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा नवा सिक्सर किंग बनला असून त्याने याबाबतीत ख्रिस गेलला मागे टाकले. अफगाणिस्तानविरुद्ध 131 धावांच्या खेळीदरम्यान, रोहितने विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक शतके ठोकण्याच्या विक्रमासह अनेक जागतिक विक्रम मोडले. त्याने सचिन तेंडुलकरला मागे टाकत तो आता विश्वचषकाच्या इतिहासात सात शतके फटकावणार एकमेव फलंदाज बनला आहे. याशिवाय रोहितने वर्ल्ड कपमध्ये आणखी एक रंजक विक्रम आपल्या नावावर केला आहे. तो विश्वचषकाच्या इतिहासात शतक झळकावणारा सर्वात वयस्कर कर्णधार ठरला आहे. या प्रकरणात रोहित शर्माने रिकी पॉन्टिंगला मागे टाकले आहे.

रोहित शर्माने वयाच्या 36 वर्षे 164 दिवसांत अफगाणिस्तानविरुद्ध 131 धावांची ही खेळी केली आहे. यापूर्वी हा विश्वचषक विक्रम रिकी पाँटिंगच्या नावावर होता. ऑस्ट्रेलियच्या या माजी कर्णधाराने 2011 च्या विश्वचषकात भारताविरुद्ध वयाच्या 36 वर्षे 59 दिवसांत शतक झळकावले होते. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर विव्ह रिचर्ड्स आहे, त्याने 1987 मध्ये 35 वर्षे 220 दिवसांत श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावले होते. फाफ डु प्लेसिस चौथ्या क्रमांकावर आहे, दक्षिण आफ्रिकेच्या या माजी कर्णधाराने 2019 च्या विश्वचषक आपले वय 34 वर्षे 358 दिवस असताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक ठोकले होते. (Rohit Sharma World Record)

याशिवाय रोहित शर्माच्या नावावर विश्वचषकाचा आणखी एक विशेष विक्रम नोंदवला गेला आहे. लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करताना रोहितच्या नावावर आता विश्वचषकातील सर्वाधिक शतकांची नोंद झाली आहे. रोहितने तीन वेळा धावांचा पाठलाग करताना शतकी खेळी साकारल्या आहेत. रोहितने या प्रकरणात गॉर्डन ग्रीनिज, रमीझ राजा आणि स्टीफन फ्लेमिंगला मागे टाकले आहे. या तिघांच्या नावावर प्रत्येकी दोन अशी दोन शतके आहेत. (Rohit Sharma World Record)

संबंधित बातम्या
Back to top button