

पुढारी ऑनलाईन डेस्क : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील पाचवा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज (दि. ८) होणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे लक्ष्य विजयाने स्पर्धेची सुरुवात करण्याकडे आहे. मात्र, चेन्नईमध्ये गेल्या काही तासांत जोरदार पाऊस झाला. आकाशात काळे ढग दिसत आहेत. अशा परिस्थितीत सामन्यावर पावसाचे ढग दाटण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :
विश्वचषकात भारत हा एकमेव संघ आहे ज्याला दोन्ही सराव सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरममध्ये पावसामुळे सराव सामने झाले नाहीत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चेन्नईतील सामन्याच्या एक दिवस आधी संध्याकाळचे सराव सत्रही रद्द करावे लागले. ऑस्ट्रेलियन संघाने हवामानाचा विचार करून इनडोअर सत्रात भाग घेतला. अशा स्थितीत पावसाचा परिणाम सामन्यावर दिसून येईल, असे बोलले जात आहे.
चेन्नईत दुपारी दोन वाजता सामना सुरू होईल. त्याआधी अर्धा तास टॉस होणार आहे. Accuweather.com नुसार चेन्नईमध्ये दुपारी तापमान ३३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता नाही, परंतु ढगाळ वातावरण असू शकते. ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता २१ टक्के आहे. संध्याकाळी ३९ टक्के अंदाज आहे की आकाशात ढगाळ वातावरण असेल.
हेही वाचा :