Asian Game 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची १०० पदके निश्चित | पुढारी

Asian Game 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची १०० पदके निश्चित

पुढारी ऑनलाईन डेस्क : चायना येथे होत आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने १०० पदके निश्चित केली आहेत. सध्या भारतीय खेळाडूंनी स्पर्धेत ९५ पदके आपल्या नावावर केली आहेत. तर पाच पदके निश्चित केली आहेत. आशियाई स्पर्धेत भारताने २०१८ साली सर्वोत्तम ७० पदके आपल्या नावावर केली होती. परंतु, यंदा आशियाई स्पर्धेत १०० पदके जिंकून भारत नवा विक्रम करणार आहे.  (Asian Game 2023)

या खेळात आहेत पदक निश्चित

  • कपांऊंड आर्चरी : भारताचे अभिषेक वर्मा आणि ओजड प्रविण हे आर्चरीच्या सुवर्ण पदकाच्या लढतीत एकमेकांना भिडणार आहेत. याचाच अर्थ या स्पर्धेत भारतात दोन पदके निश्चित आहेत. महिलांच्या स्पर्धेत ज्योति सुरेखाने ही अंतिम फेरीत धडक मारली आहे.
  • कब्बडी : कब्बडीमध्ये भारताच्या महिला आणि पुरूष संघांनी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. यामुळे कब्बडीतही भारताचे पदक निश्चित झाले आहे.
  • पुरूष हॉकी : आज(दि.६) सुवर्ण पदकासाठी भारतीय संघाची लढत जपानशी झाली. या सामन्यात  भारतीय संघाने ५-१ ने जपानचा पराभव करत सुवर्ण पदक जिंकले आहे.
  • पुरूष क्रिकेट : उपांत्य सामन्यात बांगलादेशाचा पराभव करत स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. क्रिकेटमधील सुवर्ण पदक विजेता म्हणून भारतीय संघाला दावेदार मानले जात आहे.
  • बॅडमिंटन : सात्विकसाईराज रानिकारेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी बॅडमिंटनमध्ये कांस्य पदक निश्चित केले आहे.
  • क्रिकेट : क्रिकेटमधील सुवर्ण पदक लढतीचा सामना उद्या (दि.७) होणार आहे. हा सामना भारत आणि अफगानिस्तान यांच्यात खेळवण्यात येणार आहे.
  • ब्रिज : या क्रीडा स्पर्धेत भारताचा सामना हॉंगकॉंग विरूद्ध होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला तरी रौप्य पदक निश्चित झाले आहे.

हेही वाचा :

Back to top button