ENG vs NZ : इंग्लंडचे न्यूझीलंडसमाेर २८३ धावांचे लक्ष्‍य | पुढारी

ENG vs NZ : इंग्लंडचे न्यूझीलंडसमाेर २८३ धावांचे लक्ष्‍य

पुढारी ऑनलाईन डेस्क : वन-डे (एकदिवसीय) विश्वचषक गतविजेत्या इंग्लंडने न्यूझीलंडला २८३ धावांचे आव्हान दिले आहे. नाणेफेक जिंकत न्‍यूझीलंडने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. इंग्‍लडच्‍या जो रूट, जोस बटलर आणि जॉनी बेअरस्टो यांच्‍या दमदार फलंदाजीच्‍या जाेरावर इंग्‍लडने न्‍यूझीलंडसमाेर २८३ धावांचे लक्ष्‍य ठेवले आहे.   जो रूटने सर्वाधिक ७७ धावांची खेळी केली तर जोस बटलर आणि जॉनी बेअरस्टो यांनी अनुक्रमे ४३, ३३ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने सर्वाधिक तीन बळी घेतले. तर मिचेल सॅटनर आणि ग्लेन फिलिप्स यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. (ENG vs NZ)

अपडेट्स :

ख्रिस वोक्स पाठोपाठ सॅम करन माघारी

सामन्याच्या ४६ व्या ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा गोलंदाज मॅट हेन्रीने इंग्लंडला नववा धक्का दिला. त्याने सॅम करणला बाद केले. सॅमने आपल्या खेळीत १९ बॉलमध्ये १४ धावांची खेळी केली.

इंग्लंडला आठवा धक्का; ख्रिस वोक्स माघारी

न्यूझीलंडला गोलंदाज सॅटनरने इंग्लंडला ख्रिस वोक्सच्या रूपात आठवा झटका दिला. त्याला कॅच विल यंगने पकडला. ख्रिसने आपल्या खेळीत १२ बॉलमध्ये ११ धावांची खेळी केली.

लिव्हिंस्टोन पाठोपाठ जो रूट माघारी

सामन्याच्या ४२ व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सने जो रूटला आऊट केले. जो रूटने आपल्या खेळीत ८६ बॉलमध्ये ७७ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने ४ चौकार आणि १ षटकार लगावला.   (ENG vs NZ)

इंग्लंडला सहावा झटका; लिव्हिंस्टोन बाद

सामन्याच्या ३९ व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर इंग्लंडची सहावी विकेट पडली. न्यूझीलंडचा गोलंदाज ट्रेंट बोल्टने लिव्हिंगस्टोनला मॅट हेन्रीकरवी बाद केले. लिव्हिंगस्टोनने आपल्या खेळीत २२ बॉलमध्ये २० धावांची खेळी केली.

इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत; कर्णधार बटलर बाद

सामन्याच्या ३४ व्या ओव्हरमध्ये इंग्लडची पाचवी विकेट पडली. न्यूझीलंडचा गोलंदाज मॅट हेन्रीने इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरला विकेटकीपर लॅथमकरवी झेलबाद केले. बटलरने आपल्या खेळीत ४२ बॉलमध्ये ४३ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने २ चौकार आणि २ षटकार लगावले.

जो रूटचे संयमी अर्धशतक

सामन्याच्या २९ व्या ओव्हरमध्ये ५७ बॉल खेळून जो रूटने आपले अर्धशतक केले. त्याने आपल्या खेळीत २ चौकार आणि १ षटकार लगावले आहेत. यासह जो रूट आणि जोस बटलर यांनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी केली आहे.

इंग्लंडला चौथा झटका; मोईन अली स्वतात माघारी

सामन्याच्या २२ व्या ओव्हरमध्ये ग्लिन फिलिप्सने मोईन अलीला बोल्ड करत इंग्लंडला चौथा झटका दिला. मोईन अलीने आपल्या खेळीत १७ बॉलमध्ये ११ धावांची खेळी केली.

इंग्लंडचे ‘शतक’; १९ ओव्हरमध्ये ३ बाद १०९

सामन्याच्या १९ ओव्हरच्या खेळात इंग्लंडने ३ विकेट गमावत १०९ धावा केल्या. यामध्ये जॉनी बेअरस्टोने सर्वाधिक ३५ धावा केल्या. तर हॅरी ब्रुकने २९ तर, डेव्हिड मलानने १४ धावांचे योगदान दिले. आता मैदानावर जो रूट आणि मोईन अली फलंदाजी करत आहेत.

इंग्लंडला तिसरा धक्का; हॅरी ब्रुक तंबूत

सामन्याच्या १७ व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर न्यूझीलंडचा गोलंदाज रविंद्रने आक्रमक खेळी करणाऱ्या हॅरी ब्रुकला आऊट केले. त्याचा झेल कॉन्वेने पकडला. हॅरी ब्रुकने आपल्या खेळीत १६ बॉलमध्ये २५ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने ४ चौकार आणि १ षटकार लगावला.

इंग्लंडला दुसरा झटका; जॉनी बेअरस्टो माघारी

सामन्याच्या १३ व्या ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा गोलंदाज सॅटनरला लॉग ऑफवरून फटका मारण्याच्या प्रयत्नात जॉनी बेअरस्टो बाद झाला. त्याचा झेल मिचेलने पकडला. जॉनीने आपल्या खेळीत ३५ बॉलमध्ये ३३ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने ४ चौकार आणि १ षटकार लगावला.

इंग्लंडला पहिला धक्का; डेव्हिड मलान तंबूत

सामन्याच्या आठव्या ओव्हरमध्ये डेव्हिड मलानच्या रूपात पहिला धक्क बसला. त्याला न्यूझीलंडचा गोलंदाज मॅट हेन्रीने बाद केले. त्याचा कॅच टॉम लेथमने पकडला. मलानने आपल्या खेळीत २४ बॉलमध्ये १४ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने २ चौकार लगावले.

इंग्लंडची सावध सुरूवात, ७ ओव्हर बिनबाद ३९

वन-डेच्या पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत इंग्लंडने सावध खेळी केली आहे. जॉनी बेअरस्टोने ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच षटकात एक षटकार आणि एक चौकार ठोकला. सध्या इंग्लंडने ७ ओव्हरमध्ये बिनबाद ३९ धावा केल्या आहेत. यामध्ये जॉनी बेअरस्टोने १९ बॉलमध्ये २३ धावा आणि डेव्हिड मलानने २३ बॉलमध्ये १४ धावांची खेळी केली आहे.

इंग्लंडची सावध सुरूवात, ७ ओव्हर बिनबाद ३९

वन-डेच्या पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत इंग्लंडने सावध खेळी केली आहे. जॉनी बेअरस्टोने ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच षटकात एक षटकार आणि एक चौकार ठोकला. सध्या इंग्लंडने ७ ओव्हरमध्ये बिनबाद ३९ धावा केल्या आहेत. यामध्ये जॉनी बेअरस्टोने १९ बॉलमध्ये २३ धावा आणि डेव्हिड मलानने २३ बॉलमध्ये १४ धावांची खेळी केली आहे. (ENG vs NZ)

राऊंड रॉबिन पद्धतीने होणार स्पर्धा

विश्वचषकाचे सामने भारतातील १० शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. यामध्ये हैदराबाद, अहमदाबाद, धर्मशाला, दिल्ली, चेन्नई, लखनौ, पुणे, बेंगळुरू, मुंबई आणि कोलकाता येथे स्पर्धेचे सामने खेळवण्यात येणार आहेत. या विश्वचषकात एकूण १० संघ सहभागी होत आहेत. ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक संघाला स्पर्धेतील संघाशी एक सामना खेळावा लागणार आहे. यामध्ये १० पैकी अव्वल चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. २०१९ साली झालेल्या वन-डे वर्ल्डकप वेळी इंग्लंडमध्ये याच फॉरमॅटनुसार वर्ल्ड कप आयोजित करण्यात आला होता.

दोन्ही संघांचे प्लेइंग -11

न्यूझीलंड : टॉम लॅथम (कर्णधार, विकेटकीपर), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मॅट हेन्री, मिचेल सँटनर, जेम्स नीशम, ट्रेंट बोल्ट.

इंग्लंड : जोस बटलर (कर्णधार, विकेटकीपर), जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम कुरन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड.

हेही वाचा :

Back to top button