Shubman Gill And Sara : ब्रेकअपनंतर शुबमन-सारा पुन्हा रिलेशनशिपमध्ये?

Shubman Gill And Sara : ब्रेकअपनंतर शुबमन-सारा पुन्हा रिलेशनशिपमध्ये?

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा स्टार फलंदाज शुभमन गिल बांगलादेशविरुद्ध शानदार शतक झळकावल्यानंतर चर्चेत आला आहे. गिलच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही सोशल मीडियावर तुफान चर्चा असते. सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हिच्या सोबतच्या कथित नात्यामुळे तो गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अलीकडेच त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्याही समोर आल्या होत्या. मात्र, शुभमन आणि सारा पुन्हा रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात आहे. (Shubman Gill And Sara)

सूत्रांच्या माहितीनुसार, आता शुभमन आणि सारा यांचे नाते पुन्हा एकदा घट्ट झाले आहे. या कपलच्या नात्यात आता सर्व काही ठीक असल्याचे बोलले जात आहे. एवढेच नाही तर सारा तेंडुलकरने शुभमनची बहीण शाहनील गिललाही इन्स्टाग्रामवर फॉलो करण्यास सुरुवात केली आहे. (Shubman Gill And Sara)

जुने स्क्रीनशॉट व्हायरल झाले

शुभमन आणि सारा यांच्यातील काही जुने स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यापैकी एकामध्ये, भारतीय क्रिकेटरच्या वाढदिवसाच्या लाइव्ह सत्रादरम्यान, साराने कमेंट केली – 'HBDDDDDDD', तर हार्दिक पंड्याने शुभमनचा पाय ओढण्यासाठी कमेंट केली. ज्यात लिहिले होते की, "त्यांच्या कडून तुमचे स्वागत आहे." (Shubman Gill And Sara)

सारा अली खानबद्दलही अफवा (Shubman Gill And Sara)

दरम्यान, शभमनने अभिनेत्री सारा अली खानला डेट केल्यानेही तो चर्चेत आहे. ही 'सारा' कोण याबाबत अनेक वेळा संभ्रम निर्माण होतो. रिपोर्ट्सनुसार, दोघे दिल्लीत काही वेळा एकत्र दिसले होते. सोनम बाजवाच्‍या चॅट शोमध्‍ये 'केदारनाथ'च्‍या वेळी तिला डेटींगबद्दलही विचारण्‍यात आले होते, तर तिने , कदाचित नाही' असे सांगून ते टाळले. (Shubman Gill And Sara)

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news