Tim Southee : न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साउदीच्या अंगठ्यावर उद्या शस्त्रक्रिया | पुढारी

Tim Southee : न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साउदीच्या अंगठ्यावर उद्या शस्त्रक्रिया

पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदीच्या दुखापत झालेल्या अंगठ्यावर उद्या (दि.२१) शस्त्रक्रिया होणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात त्याचा अंगठा फ्रॅक्चर झाला होता. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने (NZC) आज (दि.२०) ही माहिती दिली.

संबंधित बातम्या :

गेल्या शुक्रवारी इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात झेल घेण्याच्या प्रयत्नात टीम साऊदीच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्याच्यावर आता शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. दरम्यान, पुढील आठवड्याच्या सुरुवातीला भारतात होणाऱ्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकासाठी टीम साउदीच्या उपलब्धतेबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेडला याला आशा आहे की साउदी वेळेत बरा होईल आणि स्पर्धेसाठी परतेल.

चार सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत इंग्लंडकडून ३-१ ने पराभूत झाल्यानंतर न्यूझीलंड आता २१ सप्टेंबरपासून बांगलादेशमध्ये तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्यानंतर शुक्रवारी, २९ सप्टेंबर रोजी हैदराबादमध्ये पाकिस्तानविरुद्ध सराव सामना खेळला जाईल. सध्याच्या बांगलादेश दौऱ्यावर न जाणारे न्यूझीलंडचे खेळाडू येत्या मंगळवारपासून भारतात रवाना होणार आहेत. न्यूझीलंडचा संघ गतविजेत्या इंग्लंडविरुद्ध ५ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर मालिकेला सुरुवात करेल.

हेही वाचा :

 

Back to top button